इंग्लंड आणि भारत यांच्यातील टी-२० मालिकेतील दुसरा सामना शनिवारी (८ जुलै) बर्मिंघमच्या एजबस्टन कोसटी सामन्यात खेळला गेला. भारतीय संघाने हा सामना ४९ धावा जिंकला. मालिकेतील पहिला आणि दुसरा सामना जिंकल्यानंतर टी-२० मालिकाही जिंकली आहे. विराट कोहली या सामन्यात बॅटसह पुन्हा एकदा अवयशी ठरला, पण क्षेत्ररक्षण करताना मात्र तो खूपच आनंदात आणि उत्साहात दिसला.
विराट कोहलीने इंग्लंड विरुद्ध भारत या दुसऱ्या टी-२० सामन्यात फक्त एक धाव करून विकेट कमावली. उभय संघातील पहिल्या टी-२० सामन्यात विराट कोहली विश्रांतीवर होता. विराट या सामन्यात मोठी धावसंख्या जरी करू शकला नसली, तरी मैदानात तो पूर्ण उत्साहात दिसला. क्षेत्ररक्षण करताना त्याने चाहत्यांनाकडे पाहून डान्स केल्याचे पाहिले गेले. विराट चाहत्यांमध्ये ऊर्जा भरण्यासाठी काही डान्स स्टेप्स करत होता. तसेच विकेट मिळाल्यानंतर पं ज्या पद्धतीने एक बोट वर करतात, त्या पद्धतीचा इशाहारी विराट केला.
विराटची मैदानातील ही वागणूक पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे. सोशल मीडियावर या प्रसंगाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंट्सही आल्या आहेत.
https://twitter.com/Kaushal13__/status/1545810663112871936?s=20&t=o–Ejdy6oKU4ZyPOj4XIdg
दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा विचार केला, तर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ विकेट्सच्या नुकसानावर १७० धावा केल्या. प्रत्युत्तारत इंग्लंडने १७ षटकांमध्ये १२१ धावा करून सर्व विकेट्स गमावल्या. इंग्लंडसाठी त्यांचा अष्टपैलू मोईन अलीने २१ चेंडूत सर्वाधिक ३५ धावा केल्या. तर प्रथम फलंदाजीसाठी आल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि रिषभ पंतने संघाला वेगवान सुरुवात दिली.
यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत () पहिल्यांदाच सलामीवीराच्या रूपात फलंदाजीसाठी आला होता. पंतने या सामन्यात १५ चेंडूत २६ धावा केल्या. तर रोहित शर्माने २० चेंडूत ३१ धावा केल्या. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली. इंग्लंडसाठी रिचर्ड ग्लीसनने या सामन्यातूप पदार्पण केले आणि महत्वाच्या तीन विकेट्स घेतल्या. ग्लीसनने चार षटकात १५ धावा खर्च केल्या आणि रोहित, विराट आणि रिषभ या तीन महत्वाच्या खेळाडूंना बाद केले. ख्रिस जॉर्डनने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
दुरूनच रामराम! भुवनेश्वरपुढे नेहमीच थंडावते बटलरची बॅट, टी२०त तर ठरलाय मोठी डोकेदुखी
रोहितचा पहिल्याच षटकात ‘रॉकेट’ सिक्स, प्रत्येक क्रिकेटप्रेमीने पाहावा असा आहे हा षटकार!
वय नाही, प्रदर्शन पाहा… रोहित-विराटची विकेट घेणारा रिचर्ड इंग्लंडच्या गोलंदाजीचं भविष्य आहे भविष्य!