इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) यांच्यात मॅनचेस्टर येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत याने धमाकेदार खेळी केली आहे. या सामन्यात त्याने नाबाद १२५ धावांची खेळी करत आपल्या वनडे कारकीर्दीतील पहिले शतक झळकावले. यावेळी तो मैदानात विरोधी संघाच्या अडतणीत वाढ करत होता, तर स्टेडियममध्ये बसलेले त्याचे चाहते त्याच्यावर गाणे बसवून नाचत होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
रिषभ पंत (Rishabh Pant) याच्यावर त्याच्या चाहत्यांनी एक गाणे तयार केले आहे. त्याचे शब्द असे आहेत, ‘आम्हाला मिळाला आहे रिषभ पंत (वी हॅव गॉट रिषभ पंत)’, असे गाणे इंग्लिशमध्ये म्हणत चाहते मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफोर्डवर नाचताना दिसले आहेत. याचा व्हिडिओ ‘द भारत आर्मी’ने त्यांच्या अधिकृत सोशल मीडियाच्या अकाउंटवर शेयर केले आहे.
WE'VE GOT RISHABHHHHHH PAAAAAAANT 😍@RishabhPant17 #ENGvIND #BharatArmypic.twitter.com/ZiXaPW9f4M
— The Bharat Army (@thebharatarmy) July 17, 2022
मालिका निर्णायक या सामन्यात भारताने ५ विकेट्सने विजय मिळवला. यावेळी भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यजमान संघ ४५.५ षटकातच सर्वबाद झाला. त्यांनी भारतासमोर २६० धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारताच्या पंत आणि हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यांनी तुफानी फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. भारताने ४२.१ षटकात ५ विकेट्स गमावत हे लक्ष्य पार केले.
पंतने या सामन्यात ११३ चेंडूत १६ चौकार आणि २ षटकार मारले आहेत. हार्दिकनेही ५५ चेंडूत १० चौकाराच्या मदतीने ७१ धावा केल्या. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी १३३ धावांची भागीदारी केली. भारताच्या या विजयाबरोबरच हा व्हिडिओही सोशल मीडियावर खूप लोकांना आवडला आहे. स्टोडियमध्ये चाहते मोठ्याने गाणे म्हणत ढोल-नगाडाच्या तालावर नाचत होते.
भारताने या सामन्यात फलंदाजी करताना पहिला चार विकेट्स ७२ धावांवरच गमावल्या होत्या. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या पंतने उत्तम शॉट्स मारत बेधडक फलंदाजी केली. त्याला हार्दिकने योग्य साथ दिली आहे. तत्पूर्वी हार्दिकने या सामन्यात त्याच्या वनडे कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजीची नोंद केली आहे. त्याने ७ षटकात २४ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. भारताने तीन सामन्यांची ही वनडे मालिका २-१ अशी जिंकली, तर टी२० मालिकाही २-१ अशी आधीच जिंकली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकेत सुरू होतीये मिनी आयपीएल! भारताच्या ‘या’ सहा संघानी लावली बोली
काय सांगता! विश्वचषकातील सुपर ओव्हरपूर्वी बेन स्टोक्स गेला होता सिगारेट प्यायला
आर माधवनचा मुलगा वेदांतने मोडला नॅशनल रेकॉर्ड, सुवर्णपदकाची केली कमाई