इंग्लंडचा नवनियुक्त कसोटी कर्णधार बेन स्टोक्स याच्या नेतृत्वात संघाने न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका काही दिवसांपूर्वी जिंकली. परंतु भारताविरुद्धच्या ऍजबस्टन कसोटी सामन्यात स्टोक्सने असे काही केले, ज्यामुळे इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने त्याला धारेवर धरले. स्टोक्सने या सामन्याच्या पहिल्या डावात स्वस्तात विकेट गमावली, ती देखील स्वतःच्या चुकीमुळे.
इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) भारताविरुद्धच्या या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात अवघ्या २५ धावा करून झेलबाद झाला. भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराह आणि शार्दुल ठाकुर यांनी आधीच स्टोक्सचे दोन झेल सोडल्यामुळे त्याला महत्वाचे जीवनदान मिळाले होते. परंतु त्याने शार्दुल ठाकुर गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि विकेट गमावली. जसप्रीत बुमराह मिड ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षणासाठी उभा होता आणि त्याने एक उत्कृष्ट डाईव्ह मारून स्टोक्सचा झेल पकडला. बेयरस्टो आणि स्टोक्सने मिळून ६६ धावांची भागीदारी केली होती, पण स्टोक्स बाद झाल्यामुळे ती तुटली.
लंच ब्रेकदरम्यान केविन पीटरसन (Kevin Pietersen) म्हणाला की, “मी स्टोक्सला दबावात खेळताना पाहिले आहे. तो चेंडू हवेत मारत होता. ही निष्काळजीपणे केलेली फलंदाजी होती. तो स्वतःची विकेट वाचवण्याचा प्रयत्न करत नव्हता. कसोटी सामन्यात संयम आणि शिस्तीने फलंदाजी केली जाते. त्याने अशा पद्धतीने बाद होणे, चांगली गोष्ट नाहीये.”
इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेयरस्टोने या सामन्यातील पहिल्या सामन्यात अप्रतिम शतक ठोकले. बेयरस्टोने अवघ्या १४० चेंडूत १०६ धावा केल्या. पीटरसनच्या मते कर्णधार स्टोक्सने बेयरस्टोकडून फलंदाजीचे सल्ले घेतले पाहिजेत. न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रँडन मॅक्युलम काही दिवसांपूर्वी इंग्लंडचा मुख्य प्रशिक्षक बनला आहे. मॅक्युलमच्या मार्गदर्शानाखाली इंग्लंड संघाने आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. याविषयी बोलताना पीटरसन म्हणाला की, “बेयरस्टो इंग्लंड संघासाठी हे काम चांगल्या पद्धतीने करत आहे.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
चेंडूच ‘असा’ होता की…, पाहा विराटच्या सपोर्टमध्ये काय म्हणाला इंग्लंडचा माजी फिरकीपटू
पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने पंतची तुलना थेट ब्रायन लाराशी केली, म्हणाला…