---Advertisement---

बुमराहचा मार खाणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडचा कौतुक करणारा विक्रम, ठरला इंग्लंडचा दुसराच खेळाडू

On: शनिवार, जुलै 2, 2022 5:50 PM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvs IND) यांच्यात एजबस्टन क्रिकेट ग्राउंड, बर्मिंघम येथे पाचवा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात यजमान संघाचा कर्णधार बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघ ५ बाद ९८ धावा असा अडचणीत आला होता. त्यानंतर आलेल्या रिषभ पंत (Rishabh Pant) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) या जोडीने पहिल्या दिवसाचा खेळ गाजवत २२२ धावांची भागीदारी केली. या दोघांनीही या सामन्यात शतके झळकावली आहेत.

या सामन्यात दोन्ही संघाच्या खेळाडूंनी अनेक विक्रमे रचली आहेत. त्यामध्ये इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याने कसोटीमध्ये ५५० विकेट्सचा टप्पा पार केला आहे. त्याने १५६व्या कसोटीमध्ये ही कामगिरी केली आहे. या सामन्यात मोहम्मद शमीची विकेट त्याच्या कारकिर्दीतील ५५०वी विकेट ठरली आहे.

त्याचबरोबर ब्रॉड कसोटीच्या इतिहासामध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. या यादीत ८०० विकेट्स घेत श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज मुथय्या मुरलीधरन अव्वल क्रमांकावर कायम आहे. ब्रॉडचा संघसहकारी जेम्स अँडरसन ६५४ विकेट्स घेत तिसऱ्या स्थानावर कायम आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न आहे. त्याने १४५ सामन्यांत ७०८ विकेट्स घेतले.

ब्रॉडला स्वत:च्या आदर्श क्रिकेटपटूचा विक्रम मागे टाकण्याची संधी आहे. तो ऑस्ट्रेलियाचा दिग्गज ग्लेन मॅकग्रा यांना आपला आदर्श मानतो. त्यांचा विक्रम मोडण्यासाठी ब्रॉडला १३ विकेट्सची आवश्यकता आहे. या यादीत ते ५६३ विकेट्ससह पाचव्या क्रमांकावर आहेत. या यादीतील पहिल्या दहामध्ये असणाऱ्या खेळाडूंपैकी अँडरसन, ब्रॉड, आर अश्विन आणि नॅथन लायन सध्या खेळत आहेत.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज-

८०० – मुथय्या मुरलीधरन
७०८ – शेन वॉर्न
६५४ – जेम्स अँडरसन*
६१९ – अनिल कुंबळे
५६३ – ग्लेन मॅकग्रा
५५० – स्टुअर्ट ब्रॉड*

या सामन्यात भारताचा संघ जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला असता जडेजाने ८३ धावांवर पुढे खेळत कसोटीतील त्याचे तिसरे शतक केले आहे. त्याचे हे या वर्षातील कसोटीमधील दुसरे शतक ठरले आहे. तो बाद झाल्यानंतर बुमराहने फिनीशरची भुमिका पार पाडत ब्रॉडच्या एका षटकात ३५ धावा वसूल केल्या आहेत. त्याने १६ चेंडूत ३१ धावा केल्या. यामध्ये त्याने चार चौकार आणि दोन षटकार मारले आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

बुमराहने धुतल्यानंतर पिटरसनचा ब्रॉडला टोमणा! म्हणाला, ‘माझा विक्रम मोडल्यामुळे…’

भारताविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करण्यापूर्वीच जो रुटने रचलाय इतिहास! जाणून घ्या सविस्तर

‘कर्णधार’ बुमराहचा फुल ऑन राडा! नाबाद ३१ धावांची तुफानी खेळी करत रचला इतिहास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---