इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना इंग्लंडने एक डाव आणि ७६ धावांनी जिंकला आहे. इंग्लंडने तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. भारतीय संघ सामन्यातील त्यांच्या पहिल्या डावात अवघ्या ७८ धावांवर सर्वबाद झाला होता. दुसऱ्या डावात रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहलीला वगळता इतरांना खास योगदान देता आले नाही. मात्र संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे संपूर्ण मालिकेत अपयशी ठरल्याचे दिसले.
अजिंक्य रहाणे सध्या त्याच्या करकिर्दीतील सर्वात खराब फार्मशी झगडत आहे. यावर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियामध्ये शतक ठोकणारा अजिंक्या रहाणे त्याच्या या शतकानंतर चांगले प्रदर्शन करू शकला नाही. तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात तो केवळ १८ आणि दुसऱ्या डावात केवळ १० धावा करू शकला आहे. रहाणेच्या या खराब प्रदर्शनामुळे कर्णधार विराट पुढच्या सामन्यांमध्ये त्याच्या जागी हनुमा विहारी किंवा सुर्यकुमार यादव यांच्यातील एकाला संधी देऊ शकतो. हे दोघेही मध्यक्रमातील चांगले फलंदाज आहेत आणि त्यांना संघात संधी दिली जाऊ शकते.
जर अजिंक्य रहाणेला चौथ्या कसोटी सामन्यात संधी दिली गेली नाही, तर रोहित शर्माला संघाचा उपकर्णधार बनवले जाऊ शकत. रोहित मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारात आधीपासून संघाचा उपकर्णधार आहे. रहाणे संघातून बाहेर झाल्यावर कसोटी संघाच्या उपकर्णधार पदाची जबाबदारी त्याच्यावरच सोपवली जाऊ शकते. रोहितने या मालिकेतही चांगले प्रदर्शन केले आहे.
मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघ एक डाव आणि ७६ धावांनी हारला असून मालिकेत दोन्ही संघाने १-१ अशी बरोबरी साधली आहे. यानंतर उभय संघ २ सप्टेंबरपासून होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी तयारी करतील. हा सामना जिंकत संघांना मालिकेत आघाडी घेण्याची संधी असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
लॉर्ड्सचा शतकवीर लीड्समध्ये फ्लॉप, फॉर्म टिकवून ठेवण्यासाठी माजी खेळाडूने दिला ‘हा’ गुरुमंत्र
इंग्लंडच्या अडचणीत वाढ! ‘हा’ प्रमुख खेळाडू उर्वरित कसोटी मालिकेतून माघार घेण्याची शक्यता
इंग्लंडच्या भेदकतेपुढे भारताची भंबेरी! विराटच्या ‘या’ निर्णयांनी हुकवली सलग दुसऱ्या विजयाची संधी