इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) यांच्यात एजबस्टन क्रिकेट ग्राउंड, बर्मिंघम येथे सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात भारताच्या रिषभ पंत (Rishabh Pant)आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी पहिला दिवस गाजवला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने ९८ धावांवर ५ विकेट्स गमावले होते. अशा स्थितीत पंतने पहिल्या दिवशी तर जडेजाने दुसऱ्या दिवशी शतक केले आहे. जडेजाने शतक ठोकताच अनेक विक्रम आपल्या नावे केली आहेत.
दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू असता जडेजा ८३ धावांवर होता. त्याने मॅथ्यू पॉट्सला चौकार मारत या सामन्यातील आणि त्याच्या कारकिर्दीतील तिसरे कसोटी शतक झळकावले आहे. तो सातव्या किंवा त्याच्या खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत एका वर्षात दोन कसोटी शतक ठोकणारा भारताचा चौथा खेळाडू ठरला आहे. याआधी कपिल देव, एमएस धोनी आणि हरभजन सिंग यांनी अशी कामगिरी केली आहे. त्याने यावर्षी श्रीलंकेविरुद्ध नाबाद १७५ धावांची खेळी केली होती.
सातव्या किंवा त्याच्या खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत एका वर्षात दोन कसोटीमध्ये शतकी खेळी करणारे भारतीय फलंदाज
१९८६ – कपिल देव
२००९ – एमएस धोनी
२०१० – हरभजन सिंग
२०२२* – रवींद्र जडेजा
जडेजा हा कसोटीमध्ये भारताकडून सातव्या किंवा त्याच्या खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत कसोटीमध्ये सर्वाधिक शतकी खेळी करणारा चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. कपिल देव यांनी ७ शतके या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. तर धोनीने चार शतके करत दुसरा क्रमांक गाठला आहे. त्यानंतर जडेजा आणि अश्विन हे तीन शतके करत संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
सातव्या किंवा त्याच्या खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत कसोटीमध्ये सर्वाधिक शतकी खेळी करणारे भारतीय फलंदाज
७ – कपिल देव
४ – एमएस धोनी
३ – रवींद्र जडेजा*
३ – आर अश्विन
भारताचा पहिला डाव संपला असता सर्वबाद ४१६ धावा केल्या आहेत. यावेळी भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराहने १९३.७५च्या स्ट्राईक रेटने १६ चेंडूत ३१ धावा कुटल्या आहेत. यामध्ये त्याने चार चौकार आणि दोन षटकार मारले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
करियर सुरू झालं तेव्हाही बाजार अन् संपायला आलं तेव्हाही बाजार! ब्राॅडला फुल नडलेत इंडियावाले
पंत आणि जडेजाने काढला इंग्लंडचा घाम, एकाच डावात शतके ठोकत १५ वर्षांच्या कामगिरीची पुनरावृत्ती
रिषभ पंतने शतक करताच द्रविडचा दिसला कधीच न पाहिलेला अवतार, Video व्हायरल