इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND)यांच्यात बर्मिंघम येथे सुरू असलेल्या पाचव्या निर्णायक कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव सर्वबाद ४१६ असा संपुष्टात आला. यामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्णधार म्हणून धमाकेदार पदार्पण केले आहे. त्याने फिनीशरची योग्य भुमिका पार पाडत सगळ्यांना आश्चर्यचकित केले आहे. त्यातच विराट कोहली (Virat Kohli) याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर चांगलीच व्हायर झाली आहे.
मोहम्मद शमी बाद झाल्यावर बुमराहने दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत चौफेर फलंदाजी केली आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad)याने घेतलेली शमीची विकेट त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ५५०वी विकेट ठरली आहे. याचा आनंद साजरा करत असतानाच बुमराहने त्याच्या एका षटकात २९ धावा वसूल केल्या आहेत. ब्रॉडने त्या एका षटकात ३५ धावा दिल्या आहेत. ही कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महाग षटक ठरले आहे.
या सामन्याच्या पहिल्या डावात ब्रॉडने टाकलेल्या ८४व्या षटकात बुमराहने चार चौकार आणि दोन षटकार फटकारले. त्याने ते सहा चेंडू ज्याप्रकारे खेळले त्याचे ते शॉट्स पाहून पलेवियनमध्ये बसलेल्या विराटलाही भरपूर आनंद झाला आहे. त्याने उभे राहुन टाळ्या वाजवत बुमराहचे कौतुक केले आहे. नंतर त्याने बुमराह परत असताना त्याला आनंदाच्या भरात मिठीही मारली आहे. त्याच्या या प्रतिक्रियेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
Dugout can't believe the madness with the bat from captain Jasprit Bumrah. pic.twitter.com/D5G2Fa3z7L
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 2, 2022
35 Runs in a over in Test cricket@StuartBroad8 still the same 😜@Jaspritbumrah93 hitting like Mini Yuvraj paaji @YUVSTRONG12 #ENGvIND #INDvsENG #bumrah #Kohli pic.twitter.com/qVfrFoX9Yl
— Sports_Talk (@Bhoopen40943500) July 2, 2022
Virat Kohli and all players enjoying Jasprit Bumrah's batting. pic.twitter.com/24OpnZK3DA
— Tanuj Singh (@ImTanujSingh) July 2, 2022
बुमराहने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली आहे. त्याने १९३.७५च्या स्ट्राईक रेटने १६ चेंडूत ३१ धावा कुटल्या आहेत. नंतर गोलंदाजीला येत त्याने इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर ऍलेक्स लीज आणि झॅक क्राउली यांना एकेरी धावेवर बाद करत संघाला चांगली सुरूवात करून दिली आहे. भारताकडे ३८५ धावांची आघाडी आहे.
या सामन्याच्या पहिल्या डावात भारताकडून रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनी शतके केली आहेत. भारताच्या डावाची अडखळत सुरूवात झाल्यानंतर पंत-जडेजा जोडीने २२२ धावांची भागीदारी करत संघाचा धावफलक हलता ठेवला. पाच सामन्यांच्या या मालिकेत भारत २-१ असा आघाडीवर आहे. यातील पहिल्या चार सामन्यांमध्ये कोहलीने कर्णधारपद भुषविले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बुमराहने धुतल्यानंतर पिटरसनचा ब्रॉडला टोमणा! म्हणाला, ‘माझा विक्रम मोडल्यामुळे…’
कर्णधार जसप्रीत बुमराहकडून इंग्लंडच्या ब्रॉडची ‘युवी स्टाईल’ धुलाई, पाहा त्या रोमहर्षक ओव्हरचा थरार