भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्यातील टी-२० मालिका १-२ अशा अंतराने जिंकली. आता भारतीय संघाचा प्रयत्न आहे की, एकदिवसीय मालिकाही जिंकावी. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना भारताने १० विकेट्सने जिंकला असला, तरी इंग्लंडला मालिकेत पराभूत करणे सोपे दिसत नाही. इंग्लंडने मायदेशात खेळलेल्या मागच्या १२ एकदिवसीय मालिकांमधील आकडेवारी पाहता त्यांचे पारडे काहीसे जड दिसत आहे.
इंग्लंडने मायदेशात खेळलेल्या मागच्या १२ एकदिवसीय मालिकांचा विचार केला, तर त्यापैकी ११ मालिका इंग्लंडने जिंकल्या आहेत. भारताविरुद्ध सध्या सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेआधी इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात एकदिवसीय मालिका खेळली गेली होती. इंग्लंडने या मालिकेत पाकिस्तानचा ३-० असा पराभव केला होता. तसेच इंग्लिश संघाने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत २-१ असा विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत मात्र त्यांना १-२ असा पराभव स्वीकारावा लागलेला.
या १२ एकदिवसीय मालिकांपैकी ७ मालिकांमध्ये इंग्लंडने विरोधी संघाला क्लीन स्वीप (३-०) दिला होता. त्यांच्या या आकडेवारीवरून भारतीय संघासाठी ही मालिका जिंकणे किती कठीण असणार आहे, याचा अंदाज येऊ शकतो. असे असले तरी, सध्या इंग्लंडचे फलंदाज खराब कामगिरी करताना दिसत आहेत, ज्याचा फायदा भारतीय संघाला होऊ शकतो.
इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेपूर्वी तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली गेली होती. टी-२० मालिकेत यजमानांना पराभव स्वीकारावा लागला. या दौऱ्यात भारताने खेळलेल्या या चार सामन्यांपैकी तीन सामन्यांमध्ये इंग्लिश संघाला १५० धावांचा टप्पाही ओलांडू दिला नाही.
तसेच उभय संघात १ ते ५ जुलैदरम्यान एकमात्र कसोटी सामनाही खेळला गेला होता. कसोटी सामन्यात इंग्लंडने शेवटच्या दिवशी ३७८ धावांचे लक्ष्य गाठून विजय मिळवला होता. मागच्या वर्षी सुरू झालेल्या कसोटी मालिकेचा हा शेवटचा सामना होता, जो दमदार फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने जिंकला. कसोटी मालिका २-२ अशा बरोबरीवर सुटली.
आज (१४ जुलै) लॉर्ड्सवर होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कोणाचे पारडे ठरणार जड हे पाहण्यासारखे ठरेल. भारतीय संघ दुसरा सामना जिंकत मालिका खिशात टाकण्याच्या प्रयत्नात, तर यजमान संघ मालिकेत टिकण्यासाठी सामना जिंकण्याचा प्रयत्न करणार आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
Video: टीम इंडियाला मिळाला एक नवा फिरकीपटू, इंग्लंडमध्ये दाखवतोयं आपले कौशल्य
पहिल्या अल्टिमेट खो खो लीग स्पर्धेला पुण्यात 14 ऑगस्ट रोजी प्रारंभ