भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंडच्या (ENGvsIND) दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात टी20 आणि वनडे मालिका खेळल्या जात आहेत. यातील टी20 मालिका इंग्लंडने जिंकली असून भारताने वनडे मालिका जिंकली आहे. बुधवारी (21 सप्टेंबर) झालेल्या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने वादळी शतक केले. तिने 111 चेंडूत नाबाद 143 धावा केल्या. यातील तिने मारलेल्या शॉट्सचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्याचबरोबर तिने शतकानंतर खेळलेल्या 11 चेंडूत चौकार-षटकारांची आतिशबाजी केली आहे.
इंग्लंडने नाणेफेक जिंकल्यावर भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. यावेळी भारताने पहिली विकेट लवकर गमावली. तेव्हा शफाली वर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरल्यानंतर स्मृती मंधाना व यास्तिका भाटिया यांनी 54 धावांची भागीदारी केली. दोघी अनुक्रमे 40 व 26 धावा काढून बाद झाल्या. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) व हरलीन देओल यांनी डावा सांभाळला. कौरने विकेट्स पडल्याने संथ गतीने फलंदाजी केली. तिने 64 चेंडूत अर्धशतक केले. या दोघींनी चौथ्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी रचली. हरलीनने शानदार अर्धशतक केले.
हरमनने पूजा स्त्राकारसोबत 50 आणि दीप्ती शर्मा हिच्यासोबत नाबाद 71 धावांची भागीदारी केली. यादरम्यान तिने 100 चेंडूत शतक केले. तिचे हे वनडेतील पाचवे शतक ठरले. यानंतर तिने इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. तिने पुढील 11 चेंडूत तब्बल 43 धावा कुटल्या. तिने खेळलेल्या 11 चेंडूत 6, 4, वाईड 2, 4, 6, 4, 1, 6, 4, 4, 4, 0 असे चौकार-षटकार मारले. तसेच तिने तिच्या संपूर्ण खेळीत 128.83 स्ट्राईक रेटने खेळताना 18 चौकार आणि 4 षटकार फटकारले.
#HarmanpreetKaur
What an excellent knock by @ImHarmanpreet
143*(111 balls)😱 🔥
She was literally on fire against England today..
She helped India to reach 333 in 50 overs👏👏👌 pic.twitter.com/WPvQpqzNS3— Deepak N (@DeepakN172) September 21, 2022
भारताची धावसंख्या 47व्या षटकामध्ये 271 होती. यावेळी हरमनप्रीतने दीप्तीसोबत 18व्या षटकात 26, 19व्या षटकात 17 आणि 20व्या षटकात 19 धावा केल्या.
https://twitter.com/RahulDangi5093/status/1572616406507876354?s=20&t=QTDi4UJWt2JWs6ctNA8aJg
या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली व त्यांनी 47 धावांवर तीन बळी गमावले. यानंतर अनुभवी डॅनियला वॅटने आधी कॅप्सी व नंतर कर्णधार ऍमी जोन्स त्यांच्यासह अर्धशतकी भागीदार्या केल्या. वॅटने अर्धशतक ठोकले. त्यानंतर मात्र इतर फलंदाज झटपट बाद झाले. अखेरच्या दोन गड्यांसाठी 62 धावा जोडल्या गेल्या मात्र त्या विषयासाठी पुरेशा नव्हत्या. अखेरीस इंग्लंड संघ 245 धावांवर सर्वबाद झाला व भारतीय संघाने 88 धावांनी विजय साकार केला. वेगवान गोलंदाज रेणुका सिंगने चार बळी आपल्या नावे केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी सलामीवीर आहे आणि फिनशरही!’, टी-20 विश्वचषकाच्या संघातून वगळल्यानंतर सॅमसनची मोठी प्रतिक्रिया
जेव्हा शास्त्रींना युवा धोनीने केले होते खजील; वाचा सविस्तर घटना
पोरींनी नाव काढलं! तब्बल 23 वर्षांनंतर इंग्लंडला लोळवत जिंकली वनडे मालिका; हरमनचा शतकी धमाका