इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारतीय संघाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या वनडेमध्ये भारताने इंग्लंडवर १० विकेट्स राखून विजय मिळवला होता. परंतु दुसऱ्या सामन्यात संघाची फलंदाजी निराशाजनक राहिली आणि भारताला १०० धावांनी पराभव स्वीकारावा लागला. आपण या लेखात लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर भारतीय संघाच्या पराभवाची ५ प्रमुख कारणे पाहणार आहोत.
रोहित शर्मा –
इंग्लंडने सामना जिंकण्यासाठी भारताला २४७ धावांचे लक्ष्य दिले होते. पण भारतीय फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले आणि अवघ्या १४६ धावांवर संघ पराभूत झाला. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) या सामन्यात एकूण १० चेंडू खेळला, पण त्याला स्वतःचे खातेही खोलता आले नाही. इंग्लंडसाठी या सामन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या रीस टॉपलीने रोहितला डावाच्या तिसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर पायचीत पकडले.
शिखर धवन –
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये रोहित शर्माच्या साथीने शिखर धवन (Shikhar Dhawan) यानेही महत्वाचे योगदान दिले होते. या दोघांच्या भागीदारीच्या जोरावर भारताला विजय मिळला होता. पहिल्या सामन्यात धवनने ५४ चेंडूत एकूण ३१ धावा केल्या होत्या. पण दुसऱ्या सामन्यात मात्र धवनने २६ चेंडूत अवघ्या ९ धावा करून विकेट गमावली. संघाची धावसंख्या २७ असताना धवनच्या रूपात दुसरा झटका मिळाला होता.
विराट कोहली –
विराट कोहलीकडून या सामन्यात खूप अपेक्षा होता. विराट मालिकेतील पहिल्या वनडेमध्ये सहभागी नव्हता. अशात पुनरागमन करताना विराट धमाकेदार प्रदर्शन करेल अशी चाहत्यांना अपेक्षा होती, परंतु डेविड विलीच्या चेंडूवर त्याने स्वस्तात विकेट बदलली. विराटने या सामन्यात २५ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने १६ धावा केल्या आणि विकेट गमावली. इंग्लिश संघाचा कर्णधार जोस बटलरने त्याला झेलबाद केले. विराटच्या रूपात भारतीय संघाने चौथी विकेट गमावली.
रिषभ पंत –
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. त्याने खाते न खोलताच विकेट मागवली. ब्रायडन कार्सच्या चेंडूवर पंतने सब्स्टीट्यूट साल्ट्सने झेलबाद केले. डावाच्या ११ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर पंत बाद झाला. या विकेटनंतर संघाची धावसंख्या ३ विकेट्सच्या नुकसानावर २९ धावा झाली होती.
इंग्लंडचा उंचपुरा वेगवान गोलंदाज रीस टॉपलीने या सामन्यात सर्वोत्तम प्रदर्शन केले आणि भारतीय फलंदाजांचा घाम काढला. त्याने टाकेलेल्या ९.५ षटकांमध्ये अवघ्या २४ धावा खर्च केल्या आणि ६ महत्वाच्या विकेट्स घेतल्या. यामध्ये रोहित शर्मा, शिखर धवन, सूर्यकुमार यादव, मोहम्मद शमी, युझवेंद्र चहल आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा समावेश होता. या जबरदस्त प्रदर्शनासाठी त्याला सामनावीर निवडले गेले.
फाॅर्मात नसलेल्या कोहलीसाठी इंग्लंडच्या कॅप्टनची फलंदाजी; म्हणाला, ‘तुम्ही असे कसे….’
‘बुमराहपेक्षा कमी नाही आफ्रिदीचा जावई’, माजी क्रिकेटपटूचे मोठे भाष्य
भारताचा टर्मिनेटर हरभजन सिंग करणार क्रिकेट मैदानात पुनरागमन, पाहा कधी आणि कोणता सामना खेळणार