इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) या कसोटी सामन्यात भारताला ७ विकेट्सने पराभूत व्हावे लागले. या सामन्यात भारताचे यजमान संघासमोर ३७८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) आणि जो रुट (Joe Root) यांच्या नाबाद शतकी खेळीमुळे इंग्लंडने हा सामना सहज जिंकला. या विजयामुळे पाच सामन्यांची कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत राहिली आहे. हा सामना भारतीय संघ जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्या नेतृत्वाखाली खेळला. या सामन्यात त्याने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. त्याने या मालिकेत सर्वाधिक २३ विकेट्स घेत मालिकावीराचा पुरस्कार पटकावला.
मालिकावीराचा पुरस्कार पटकावल्याबरोबरच बुमराहने विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma) यांची बरोबरी केली आहे. बुमराह हा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात मालिकावीराचा पुरस्कार पटकावणार पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे. बुमराहच्या अगोदर विराट, रोहित, भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यांनी अशी कामगिरी केली आहे. त्याने या सामन्यात पहिल्या डावात फिनिशर, मग अप्रतिम गोलंदाजी, उत्कृष्ठ क्षेत्ररक्षण केले आहे.
2⃣3⃣ wickets
Best bowling Figures (In Innings): 5⃣/6⃣4⃣
An average of 2⃣2⃣.4⃣7⃣#TeamIndia's Player of the Series is @Jaspritbumrah93 👏 👏 #ENGvIND pic.twitter.com/APkOhYC1tJ
— BCCI (@BCCI) July 5, 2022
भारताने या सामन्याच्या पहिल्या डावात रिषभ पंत (Rishabh Pant) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांच्या शतकाच्या जोरावर ४१६ धावा केल्या होत्या. त्याच्या बदल्यात इंग्लंडचा पहिला डाव २८४ धावांतच संपुष्टात आला होता. नंतर भारताने २४५ धावा करत यजमान संघासमोर ३७८ धावांचे लक्ष्य ठेवले होते.
चौथ्या दिवसाखेर भारताला सामना जिंकण्यासाठी ७ विकेट्स तर इंंग्लंडला ११९ धावांची आवश्यकता होता. त्यावेळी बेयरस्टोने नाबाद ११४ आणि रुटने नाबाद १४२ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. रुटने त्याच्या कसोटी कारकीर्दीतील २८वे आणि भारताविरुद्धचे ९वे शतक पूर्ण केले. बेयरस्टोचे हे या सामन्यातील दुसरे शतक ठरले.
बेयरस्टोला सामनावीराचा तर बुमराह बरोबरच रुटही मालिकावीराचा मानकरी ठरला. रुटने या मालिकेत ७३७ धावा केल्या असून त्याने चार शतके शतके केली आहेत.
इंग्लंड विरुद्ध भारत यांमध्ये आता मर्यादीत षटकांचे सामने होणार आहेत. यामध्ये तीन सामन्यांची टी२० आणि वनडे मालिका खेळली जाणार आहे. यातील पहिला टी२० सामना ७ जुलैला साउथम्पटन येथे खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय दिग्गजांनी गायले इंग्लंडचे कौतुक, टीम इंडियाला म्हटले ‘या’ चुका सुधारा
विराटला बार्मी आर्मीनेही केलं ट्रोल; लिहिले कोहलीने १८ महिन्यात जेवढ्या धावा नाही केल्या त्यापेक्षा…