इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) यांच्यात बर्मिंघम येथे झालेल्या एजबस्टन कसोटी सामन्यात यजमान संघाने ७ विकेट्सने विजय मिळवला आहे. यामुळे पाच सामन्यांची ही कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली आहे. या सामन्यात इंग्लंडचा माजी कर्णधार जो रुट (Joe Root) आणि जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) यांनी शतके झळकावले आहे. या शतकाबरोबरच रुटने अनेक विक्रमे केली आहेत.
रुटने या सामन्यात १३६ चेंडूत त्याच्या कसोटी कारकीर्दीतील २८वे शतक केले आहे. शतक करताच त्याने फॅब फोरच्या यादीतील विराट कोहली (Virat Kohli), स्टीव स्मिथ (Steve Smith) आणि केन विलियमसन (Kane Williamson) यांना मागे टाकले आहे. विराट आणि स्टीव या दोघांनीही प्रत्येकी २७ कसोटी शतके केली आहेत. तर विलियमसनच्या नावावर २४ कसोटी शतके आहेत.
रुटचे हे या मालिकेतील चौथे तर भारताविरुद्ध ९वे शतक ठरले आहे. याबरोबरच त्याने भारताविरुद्ध कसोटीमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तो पहिल्या डावात ३१ धावांची खेळी करत बाद झाला होता. या सामन्यात त्याने दुसऱ्या डावात झंझावाती सामना विजयी शतक केले आहे. त्याने ६७व्या षटकामध्ये मोहम्मद सिराजच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारत शतक पूर्ण केले आहे.
या सामन्याच्या दुसऱ्या डावात विजयाचा पाठलाग करताना रूट-बेयरस्टो जोडीने २६९ धावांची भागीदारी रचली आहे. त्यांनी भारतीय गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत अप्रतिम शॉट्स खेळले आहेत. दोघांनीही ७५ पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.
रुटने या सामन्यात १७३ चेंडूत नाबाद १४२ धावा केल्या आहेत. तर बेयरस्टोने १४५ चेंडूत नाबाद ११४ धावा केल्या आहेत. या सामन्यातील विजयी धाव रुटने रवींद्र जडेजाला रिवर्स स्वीप शॉट मारत वसूल केली आहे. या मालिकेत त्याने १०५. २८च्या सरासरीने ७३७ धावा केल्या असून दोन विकेट्सही घेतल्या आहेत. यामुळे त्याने द्विपक्षीय कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. याआधी हा विक्रम विराटच्या नावावर होता. त्याने २०१६-१७मध्ये इंग्लंड विरुद्ध ६५५ धावा केल्या होत्या.
So @root66's series stats are an absolute joke! 🐐
🏴 #ENGvIND 🇮🇳 pic.twitter.com/jzKru38I85
— England Cricket (@englandcricket) July 5, 2022
हा सामना संपला असता रुटला आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांना मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले. तर बेयरस्टोला सामनावीराचा पुरस्कार मिळाला आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या अनुपस्थितीत बुमराहला भारताचा या सामन्यासाठीचा कर्णधार म्हणून नेमले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारत हारला, पण बुमराह जिंकला; फक्त कौतुकच करावं असं प्रदर्शन करत मानाचा अवॉर्ड घेऊन गेला
पाचव्या कसोटीनंतर पहिल्या टी२० सामन्यालाही मुकणार रोहित शर्मा? समोर आली मोठी अपडेट
इंग्लंडनंतर ऑस्ट्रेलियानेही आखली भारताला पराभूत करण्याची व्यूहरचना