इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ एक डाव आणि ७६ धावांनी पराभूत झाला. संघाच्या या पराभवामागे प्रमुख कारण ठरले, भारतीय फलंदाजांचे खराब प्रदर्शन. या फलंदाजांमध्ये पहिल्या दोन सामन्यात चांगले प्रदर्शन करणारा फलंदाज केएल राहुलचाही समावेश आहे. मालिकेच्या आधी मयंक अगरवालला झालेल्या दुखापतीमुळे राहुलला संघात संधी मिळाली. त्याने मालिकेतील सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये संघाने त्याच्यावर दाखवलेला विश्वास योग्य सिद्ध केला. मात्र मालिकेतील तिसऱ्या सामन्यात राहुल अपयशी ठरला आहे. अशात भारताचा माजी फिरकी गोलंदाज मनिंदर सिंगने राहुलला त्याचा चांगला फार्म संपूर्ण मालिकेत टिकवण्यासाठी एक सल्ला दिला आहे.
राहुलला मालिकेतील तिसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात खाते खोलता आले नाही आणि त्यानंतर दुसऱ्या डावात तो अवघ्या ८ धावा करून क्रेग ओव्हरटनच्या चेंडूवर बाद झाला.
इएसपीएन क्रिकइन्फोवर बोलताना मनिंदर सिंगने म्हटले, “तुमचे काही कसोटी सामने चांगले गेले असतील, तेव्हा हे कोणासोबतही होऊ शकत. ज्याप्रकारे तो त्याच्या पहिल्या डावात बाद झाला, त्यामुळे त्याच्या मनात संशय निर्माण झाला की, तो या प्रकारच्या खेळपट्टीवर फलंदाजी करण्यासाठी सक्षम आहे का? जेथे चेडू सीम आणि चारी बाजूंनी स्विंग करू शकतो.”
तो पुढे बोलताना म्हणाला, “जोपर्यंत केएल राहुलची गोष्ट आहे, हा त्याच्यासाठी धडा आहे की जेव्हा चांगल्या फर्ममध्ये असाल तेव्हा त्याला कायम ठेवा आणि आत्मसंतुष्ट होऊ नका. जसे त्याने पहिल्या डावात केले होते. कारण पुढे फलंदाजाला त्याच्या शैलीवर संशय होऊ लागतो”
लाॅर्ड्सवरील दुसऱ्या कसोटीमधील विजयानंतर भारतीय संघ तिसऱ्या सामन्यासाठी पूर्ण विश्वासासह मैदानार उतरला होता. मात्र, इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर खेळताना भारतीय फलंदाजांनी चुकीचे शाॅट खेळून त्यांच्या विकेट्स स्वस्तात गमावल्या. परिणामी भारतीय संघ त्यांच्या पहिल्या डावात अवघ्या ७८ धावांवर सर्वबाद झाला. इंग्लंडने या समान्यात अप्रतिम फलंदाजी करत मोठी आघाडी मिळवली.