भारत आणि इंग्लंड यांच्यात द ओव्हल मैदानावर कसोटी मालिकेतील चौथा सामना २ सप्टेंबरपासून खेळला जात आहे. भारतीय अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाला आतापर्यंतच्या चारही सामन्यांमध्ये संघात खेळण्याची संधी मिळाली आहे. दुसरीकडे भारताचा प्रतिभाशाली फिरकी गोलंदाजी अष्टपैलू रविचंद्रन अश्विनला अद्याप संघात संधी मिळलेली नाही.
अशात चौथ्या कसोटी सामन्यामध्ये जडेजाला उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्याच्या जागेवर फलंदाजीसाठी पाठवले गेले होते. असे असले तरीही, जडेजाला मिळालेल्या या संधीचे सोने करता आले नाही. याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचे माजी खेळाडू संजय मांजरेकर यांनी जडेजावर टीका केली आहे. त्यांनी टीकेत असे म्हटले आहे की, भारतीय संघ जडेजाला जास्त महत्व देत आहे.
चौथ्या कसोटी सामन्यात महत्त्वाच्या क्षणी जडेजा अवघ्या १० धावांवर बाद झाला. ३४ चेंडूंचा सामना करताना २ चौकारांच्या मदतीने त्याने या धावा केल्या. या छोटेखानी खेळीनंतर ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर जो रूटच्या हातून जडेजा झेलबाद झाला.
जडेजाला क्षमतेपेक्षा जास्त महत्व दिले जात आहे
सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर समालोचन करताना संजय मांजरेकर बोलत होते. ते म्हणाले, “मला वाटत आहे की, कसोटी क्रिकेटमध्ये टी२० क्रिकेटप्रमाणे विचार करण्याची पद्धत वापरली जात आहे. क्रमांक पाचवर जडेजाला संधी देणे, त्याच्या क्षमतेला गरजेपेक्षा जास्त वाढवून-चढून पाहण्यासारखे आहे. या परिस्थितीत जडेजाला वरती खेळायला पाठवणे खूप अडचणीचे ठरू शकते. मला वाटते परदेशी धरतीवर जडेजाला त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त महत्व दिले जात आहे.”
अश्विनला मैदानाबाहेर ठेवून जडेजाला संधी दिल्यामुळे संजय मांजरेकर नाराज
भारत आणि इंग्लंडमधील सध्या चालू असलेल्या कसोटी मालिकेतील चारही सामन्यांमध्ये भारतीय संघाने अश्विनला संधी न देता जडेजाला संघात संधी दिली आहे. सध्या अश्विनही त्याच्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तरीदेखील त्याला संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली गेली नाही. याच कारणास्तव, मांजरेकरांनी जडेजाच्या चौथ्या कसोटी सामनामधील खराब प्रदर्शनानंतर त्याच्यावर अशी टीका केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘सीएसके, सीएसके…’, मोईनला पाहून भारतीय चाहत्यांची नारेबाजी; अष्टपैलूही झाला ‘असा’ रिऍक्ट
‘बेटा, तू फक्त मोहालीत असं करून दाखव, मग पाहा’; वारंवार मैदानात घुसणाऱ्या जार्वोला सेहवागचा इशारा
रोहितचा झेल तर क्लास होताच; पण त्यानंतर कोहली, पंत अन् राहुलने केलेले सेलिब्रेशन पाहिले का?