इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) यांच्यात झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात यजमान संघाला पराभवाचा धक्का बसला आहे. रोझ बाऊल, साउथम्पटन येथे झालेला हा सामना भारताने ५० धावांनी जिंकला आहे. यामुळे भारतीय संघ तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत १-०ने पुढे आहेत. या सामन्यातून भारताच्या अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याने अखेर आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे. त्याने पदार्पणाच्या सामन्यातच विशेष कामगिरी केली आहे. त्याच्याबरोबरच हार्दिक पंड्या (Hardik Pandya) हा पण या सामन्यात चमकला आहे. या दोघांच्या कामगिरीवर चाहते आणि भारताचे अनेक माजी क्रिकेटपटू खूष झाले आहेत. त्यातील काहींनी आपली मतही व्यक्त केली आहेत.
या सामन्यात हार्दिकने अष्टपैलू खेळी केली आहे. तर अर्शदीपनेही पहिल्याच सामन्यात २ विकेट्स घेत दमदार पदार्पण केले आहे. त्यांच्या या खेळीचे भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी कौतुक केले आहे. त्यांनी कूवर व्हिडिओ पोस्ट करत लिहिले, हार्दिकसारखे कोणीच नाही, अर्शदीपनेही उत्तम पदार्पण केले आहे.
कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सूर्यकुमार यादव आणि दीपक हुड्डा यांनीही तुफानी फलंदाजी केली. या दोघांचाही स्ट्राईक रेट १९०च्या पुढे होता. सूर्यकुमारने ३९ धावा आणि दीपकने ३३ धावा केल्या. यावेळी हार्दिकने ३३ चेंडूत ५१ धावा केल्या. यामुळे भारताने २० षटकात ८ विकेट्स गमावत १९८ धावा केल्या. नंतर त्याने ४ षटके टाकताना ४ विकेट्सही घेतल्या आहेत. या सामन्यातून भारतीय संघात पदार्पण करणाऱ्या अर्शदीपने त्याचे पहिलेच षटक निर्धाव टाकले. त्याने ३.३ षटके टाकताना १८ धावा देत २ विकेट्सही घेतल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हे भारीये! अतिशय महत्त्वाच्या क्रिकेट मॅचला रिमोट कंट्रोल कारने पीचवर आणला बॉल, व्हीडियो वायरल
बेन स्टोक्सचं कौतूक करताना माजी कर्णधार थकेना; म्हणे, तो आपल्याच…
पुन्हा एकदा रोहितच! टी२० क्रिकेटमध्ये कोहलीचा विक्रम केला आपल्या नावावर