इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) यांच्यात दुसरा टी२० सामना एजबस्टन क्रिकेट ग्राउंड खेळला गेला. या सामन्यात भारताने ४९ धावांनी विजय मिळवला आहे. यामुळे भारताने तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) संघात परतला आहे. हा सामना जिंकताच त्याच्या नावावर एक मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
रोहित हा क्रिकेटच्या तिन्ही प्रकार मिळून सलग १९ सामने जिंकणारा भारतीय कर्णधार ठरला आहे. त्याचबरोबर त्याने सलग १४ आंतरराष्ट्रीय टी२० सामने जिंकणाऱ्या भारतीय कर्णधाराचा पराक्रमही आपल्या नावे केला आहे. ही मालिका जिंकताच त्याने विराट कोहली (Virat Kohli) याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. विराटने इंग्लंड विरुद्ध टी२० मालिका जिंकली होती. आता रोहितनेही इंग्लंड विरुद्ध टी२० मालिका जिंकत विराटची बरोबरी केली आहे.
या सामन्यात इंग्लंडने नाणफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ८ विकेट्स गमावत १७० धावा केल्या होत्या. यामध्ये रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याची नाबाद ४६ धावांची खेळी विशेष ठरली आहे. रोहित आणि रिषभ पंत (Rishabh Pant) यांनी सामन्याची सुरूवातच धमाकेदार केली आहे. दोघांनी चौकार-षटकार मारले. दोघे बाद झाल्यावर विराटही लवकर बाद झाला. नंतर मात्र हर्षल पटेल, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांनी थोडेफार आपले योगदान देत संघाला चांगली धावसंख्या उभारण्यात मदत केली.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड संघाने पुन्हा एकदा सलामीवीर जेसन रॉय आणि जोस बटलर (Jos Buttler) यांच्या विकेट्स लवकर गमावल्या. मोईन अली याने ३१ आणि डेविड विले याने नाबाद ३३ धावा करत संघाचा धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह पुढे त्यांचा काही निभाव लागला नाही. भुवनेश्वरने ३ षटकात १५ धावा देत ३ विकेट्स घेतल्या, तर बुमराहने तेवढ्याच षटकात १० धावा देत २ विकेट्स घेतल्या. युझवेंद्र चहलने २ षटकात १० धावा देत २ विकेट्स घेतल्या.
इंग्लंड विरुद्ध भारत तिसरा टी२० सामना रविवार (१० जुलै) ट्रेंट ब्रीज, नॉटींघम येथे खेळला जाणार आहे. हा सामना जिंकत यजमान संघाला क्लिन स्वीप देण्याचा भारतीय संघाचा हेतू असणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सामने जिंकूनही भारतीय संघाचं टेन्शन दूर होईना! विश्वचषकापूर्वी भारतीय संघात ‘या’ ५ उणिवा
क्रिकेटच्या मैदानावरील सुपरहिरो गावसकर झाले होते मराठी चित्रपटात हिरो
कझाकिस्तानच्या रिबाकिनाने रचला इतिहास; पहिल्याच प्रयत्नात पटकावले विम्बल्डनचे जेतेपद