भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा सामना २ सप्टेंबरपासून (गुरुवार) ओव्हलवर खेळला जाणार आहे. मालिकेत दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीवर आहेत. मालिकेतील खेळल्या गेलेल्या मागच्या तीन सामन्यात संघाने दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला संधी दिली गेली नाही. अश्विनला मैदानाबाहेर बसलेला पाहून इंग्लंडचे खेळाडूही हैराण आहेत. अशात भारताविरुद्धच्या ओव्हलवरील चौथ्या कसोटी सामन्याआधी इंग्लंडचा उपकर्णधार मोईन अलीने अश्विनच्या मैदानाबाहेर बसण्याबाबत त्याचे मत व्यक्त केले आहे.
मोईनने चौथ्या कसोटी सामन्याआधी सांगितले की, “मी अश्विनच्या आतापर्यंत न खेळल्याने हैराण आहे. मात्र, मला वाटते रविंद्र जडेजा अद्भुत क्रिकेटपटू आहे आणि जगातल्या माझ्या सर्वात आवडीच्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे. मी जडेजाला नेहमी माझ्या संघात ठेवले असते. मला वाटते की, लाॅर्ड्सवर जिंकल्यानंतर भारताने चार वेगवान गोलंदाजांसह उतरण्याची रणनीती स्विकारली आणि जडेजाने आप्रतिम प्रदर्शन केले. तरीही मला विश्वास आहे की, पुढच्या कसोटी सामन्यात अश्विनच्या नावाचा विचार केला जाईल.”
ओव्हलवर फिरकी गोलंदाजांनी मदत मिळणार
इंग्लंडचा उपकर्णधार मोईन अलीचं मत आहे की, ओव्हलच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळणार आहे. मोईन अलीने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध २०१७ मध्ये ओव्हलवर हॅट्रिक घेतली होती. तो बोलताना म्हणाला, “मी पुन्हा हॅट्रिकची आशा नाही करत. मात्र, आशा आहे की, खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळेल. ही फलंदाजांसाठी चांगली खेळपट्टी आहे आणि अंतिम टप्प्यात फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरणार आहे.”
लाॅर्ड्स कसोटी सामन्याद्वारे दोन वर्षांनी इंग्लंडच्या कसोटी संघात पुनरागमन केलेला मोईन अली पुढे बोलताना म्हणाला, “इंग्लंडसाठी कोणत्याही क्रिकेट प्रकारामध्ये कर्णधार किंवा उपकर्णधारपद सांभाळणे सन्मानाची गोष्ट आहे आणि मी खुप उत्सुक आहे.”
अश्विनच्या संघातील स्थानाचा निर्णय सामन्याच्या आधी होणार
अश्विन ओव्हल कसोटी सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुणने असे म्हटले आहे की, “गुरुवारी आर अश्विनबाबत निर्णय होईल की, हा ऑफ स्पिनर प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील होणार की नाही? भरत अरुणने अशीही आशंका व्यक्त केली की, इंग्लंडचा संघ अश्विनला पाहून खेळपट्टी बदलू शकतो. म्हणजेच ओव्हलची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करते. मात्र अश्विनमुळे ते या खेळपट्टीला वेगवान गोलंदाजांसाठी तयार केले जाऊ शकते.”
महत्त्वाच्या बातम्या-
उत्कंठावर्धक सामना! बरोबरीनंतर सुपर ओव्हरचा थरार, अखेर निकोलसच्या पठ्ठ्यांपुढे पोलार्डचा संघ नामोहरम
ओव्हल कसोटीत अश्विन आणि शार्दुलचे पुनरागमन? ‘अशी’ असू शकते भारताची संभाव्य प्लेइंग Xi
गेल्या ५० वर्षांत ओव्हलवर उघडले नाही विजयाचे खाते; ‘विराटसेना’ करणार हा नकोसा रेकॉर्ड ब्रेक…!