---Advertisement---

आधी शार्दुल मग रिषभ, मांजरेकरांचे कौतुकास्पद बोल अन् लयीतील फलंदाज तंबूत; झाले ट्रोल

On: सोमवार, सप्टेंबर 6, 2021 12:08 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामना ओव्हलवर खेळला जात आहे. सामन्यादरम्यान समालोचक आणि माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांंजरेकर चर्चेत आले आहेत. पण त्यांचे सोशल मीडियावर कौतुक होत नसून ते भरपूर ट्रोल होत आहेत. नेटकरी त्यांना समालोचनातून बाहेर करण्याची मागणी सुद्धा करत आहेत. हा प्रकार घडण्यामागचे खरे कारण आहे? जाणून घेऊया.

भारत-इंग्लंड संघातील चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात शार्दुल ठाकुर आणि रिषभ पंत ही जोडी चांगली फलंदाजी करत होती. समालोचक मांजरेकरांनी त्यांच्या या खेळीचे कौतुक करताच शार्दुल ठाकुर बाद झाला. त्यानंतर रिषभ पंतने अर्धशतक केल्यामुळे मांजरेकरांनी त्याचे कौतुक केले आणि पुढच्याच चेंडूवर रिषभही बाद झाला. यामुळेच समालोचक संजय मांजरेकर चाहत्यांच्या निशाण्यावर आले आहेत. नेटकरी त्यांना चांगलेच ट्रोल करत आहेत.

https://twitter.com/Boyfromearth2/status/1434522554333466625?s=20

त्यांचे वक्तव्य आणि या २ मैदानावर तळ ठोकलेल्या फलंदाजांचे बाद होणे, हा निव्वळ योगयाग जरी असला तरीही चाहत्यांना मात्र ते पटलेले नाही. यामुळेच या घटनेनंतर भारतीय संघाचे काही चाहते संजय मांजरेकरांना काॅमेंट्री बाॅक्समधून बॅन करण्यासाठी मागणी करत आहेत आणि त्यांना भारतीय संघासाठी ‘अपशकुन’ म्हणत आहेत.

चाहत्यांच्या म्हणण्याप्रमाणे चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशीही जेव्हा मांजरेकर काॅमेंट्री बाॅक्समध्ये होते; तेव्हा संघाने चांगले प्रदर्शन करणाऱ्या रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांच्याही विकेट्स गमावल्या होत्या आणि सामन्याच्या चौथ्या दिवशीही अगदी तसेच झाले आहे. या घटनेनंतर मांजरेकर ट्विटरवर ट्रेंडिंगला आले आहेत आणि त्यांना सामालोचनातून बाहेर करण्याची मागणी केली जात आहे.

सामन्याच्या चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात शार्दुल ठाकुर आणि रिषभ पंत यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारतीय संघ मजबूत स्थितीत आला आहे. त्यांच्या भागिदारीमुळे भारतीय संघाने त्यांच्या दुसऱ्या डावात ४६६ धावा केल्या असून ३६८ धावांची आघाडी घेतली.

सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाची सुरुवात काही चांगली झाली नव्हती. रविंद्र जडेजा दुसऱ्या डावात केवळ १७ धावा करु शकला आणि ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीवेळी बाद झाला. त्यानंतर रहाणे आणि कर्णधार विराट कोहलीनेही त्यांच्या विकेट्स स्वस्तात गमावल्या. कोहली ४४ धावांवर चांगली खेळी करत होता, पण तोही मोईन अलीच्या फिरकी चेंडूचा शिकार झाला. पहिल्या सेशनमध्ये इंग्लंडने भारताचे तीन महत्वाचे खेळाडू बाद केले होते. मात्र, दुसऱ्या सेशनमध्ये पंत आणि शार्दुल ठाकुरने इंग्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केलेली दिसली.

महत्त्वाच्या बातम्या-

ओव्हलवरील दे दणादण प्रदर्शनाने शार्दुल बनला भारताचा नवा नायक, पण ‘या’ खेळाडूंची जागा धोक्यात

ओव्हल कसोटी जिंकण्यासाठी इंग्लंडला चमत्काराची गरज! भारताविरुद्धची ‘ही’ आकडेवारी देते ग्वाही

अतिविश्वास भोवणार? सातत्याने अपयशी होऊनही प्रशिक्षकांना रहाणेवर विश्वास, केले मोठे भाष्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---