भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकुर याने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी त्याचे दुसरे कसोटी अर्धशतक केले. इंग्लंडविरुद्धचा चौथा कसोटी सामना द ओव्हल स्टेडियमवर २ सप्टेंबरपासून खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. पहिल्या दिवशीचा खेळ संपल्यावर शार्दुलने पत्रकार परिषदेत बोलताना त्याच्या चांगल्या फलंदाजी प्रदर्शनाविषयी खुलासा केला आहे.
त्याने त्याच्या चांगल्या खेळीसाठी भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर यांनाही श्रेय दिले आहे. फलंदाजीत सुधारणा करण्यासाठी त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले असल्याचे शार्दुलचे सांगितले आहे.
शार्दुलने गुरुवारी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात दमदार खेळी केली. त्याने सामन्यात जेम्स अँडरसन, ओली राॅबिन्सन, क्रेग ओवरटन यांची चांगली धुलाई केली आहे. त्याने केवळ ३१ चेंडूत अर्धशतक केले आहे. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक ठरले आहे. सामन्यात भारताच्या वरच्या फळीतील फलंदाजांच्या निराशाजनक प्रदर्शनानंतर, शार्दुलच्या दमदार खेळीच्या जोरावर संघाची धावसंख्या २०० धावांच्या जवळ पोहचू शकली. संघची स्थिती १२७ धावांवर ७ बाद अशी असताना त्याने त्याच्या चांगल्या खेळीला सुरुवात केली आणि ३६ चेंडूंमध्ये १५७ च्या स्ट्राइक रेटने ५७ धावा केल्या.
त्याला विचारले गेले की, तो त्याच्या संघाच्या अपेक्षांचा किती दबाव घेतो? त्यावर तो म्हणाला, “आम्ही संघाची जबाबदारी घेतली पाहिजे. मी वेगवान गोलंदाज आहे की फिरकी गोलंदाज? याने काहीच फरक नाही पडत. जर काही करायची गरज आहे, तर मला करावेच लागेल. मी याला अशाप्रकारे घेतो. मी याला एका आव्हानाप्रमाणे घेतो. मी एकाच वेळी माझ्या बॅट आणि चेंडूने प्रभाव टाकायला हवा, असे मला वाटते.”
महत्त्वाच्या बातम्या-
‘त्याचे अर्धशतक माझ्या खेळीपेक्षाही खूप मोठे’, शार्दुलची दे दणादण फटकेबाजी पाहून सेहवागही प्रभावित
सामन्यादरम्यान शास्त्रींना झोप अनावर, कोणाला पत्ता लागू नये म्हणून लढवली भन्नाट शक्कल!! फोटो व्हायरल
‘त्याचे अर्धशतक माझ्या खेळीपेक्षाही खूप मोठे’, शार्दुलची दे दणादण फटकेबाजी पाहून सेहवागही प्रभावित