भारत आणि इंग्लंड यांच्यात शुक्रवारपासून (१० सप्टेंबर) कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना खेळला जाणार आहे. द ओव्हलवरील चौथ्या कसोटी सामन्यात मिळवलेल्या विजयानंतर भारताने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे इंग्लंडचा संघ पाचवा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याच्या प्रयत्नात असेल. तर दुसरीकडे भारतीय संघ की १४ वर्षानंतर इंग्लंडला त्यांच्याच घरी हरवून इतिहास घडवण्याचा प्रयत्नात असेल.
यापूर्वी राहुल द्रविडच्या नेतृत्वात भारतीय संघाने २००७ मध्ये इंग्लंडला त्याच्याच घरात हरवले होते. भारतीय संघ तोच इतिहास पुन्हा घडवण्याचा प्रयत्न करेल. यासाठी वातावरणाची साथ असणे गरजेचे आहे.
मँचेस्टरमध्ये पुढच्या पाच दिवसांचे हवामान पाहिले तर पाऊस सामन्यामध्ये अढथळा निर्माण करू शकतो असे दिसते. एका दृष्टीने पाहिले तर हे भारतीय संघासाठी फायद्याचेच आहे. कारण पावसामुळे सामना अनिर्णीत झाला तर भारत मालिका २-१ अशा आघाडीने जिंकेल.
मँचेस्टरमधील पुढच्या काही दिवसांचे वातावरण पाहिले तर कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसाची ५०% शक्यता आहे. विशेषकरून हा पाऊस सकाळच्या वेळेत येऊ शकतो. तर दुपारच्या वेळेतही पावसाची शक्यता सांगितली गेली आहे. तसेच दिवसभर ढगाळ वातावरण असणार आहे. अशात सामन्याच्या पहिल्या दिवसावर पावसाचा परिणाम होऊ शकतो.
एक्यूवेदर डाॅट काॅमच्या माहितीप्रमाणे मँचेस्टर कसोटीच्या दुसऱ्या दिवशीही हवामान असेच राहणार आहे. दुसऱ्या दिवशीही ढगाळ वातावरण असेल आणि सतत थांबून-थांबून पाऊस येत राहील. अशात या सामन्यात नाणेफेक महत्वाची भूमिका पार पाडेल. कारण वातावरण असेच राहिले, तर संघ प्रथम गोलंदाजी करेल. असे असले तरी, चांगली गोष्ट ही आहे की तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी पावसाची शक्यता खूपच कमी आहे. आभाळ येत-जात राहील.
सामन्याच्या शेवटच्या दिवशी पावसाची दाट शक्यता आहे. या दिवशी पाऊस पडण्याची ७३% शक्यता आहे. त्यामुळे सामन्यातील शेवटच्या दिवशीचा खेळ पावसामुळे थांबू शकतो. पाचव्या दिवशी तापमान १६ ते २० डिग्री एवढे असेल. नाॅटिंघम कसोटीतही पाचव्या दिवशी पावसामुळे एकही चेंडू खेळला गेला नव्हता. या सामन्यात भारतीय संघ मजबूत स्थितीत असूनही सामना अनिर्णीत झाला होता. मँचेस्टरमध्येही असेच पाहायला मिळू शकते.
अश्विनला जडेजाच्या जागेवर मिळू शकते संधी
पाचव्या सामन्यातील पावसाच्या अंदाजामुळे भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. तरीदेखील कर्णधार विराट कोहली ४ वेगवान गोलंदाजांसह सामन्यात उतरण्याचा फाॅर्म्यूला बदलेल, अशी शक्यता कमी आहे. पाचव्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्याजागी मोहम्मद शमीला संघात सामील केले जाऊ शकते. भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये उमेश यादव आणि शार्दुल ठाकुर यांचे स्थान पक्के मानले जात आहे.
संघात फिरकी गोलंदाजाच्या रूपात रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांच्यातील एकालाच संधी मिळण्याची शक्यता आहे. अश्विन या मालिकेत एकही कसोटी सामना खेळला नाही, अशात कर्णधार कोहली त्याला संधी देऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
सीपीएलमध्ये ३९ वर्षीय खेळाडूने बाउंड्री लाईनजवळ उडी मारुन घेतला भन्नाट झेल, पाहा व्हिडिओ
‘तो खेळाडू पाचव्या कसोटी सामन्यात संघात यायलाच हवा’, गावसकरांचा सल्ला
शिखरला भारताच्या टी२० विश्वचषकाच्या संघातून बाहेर करण्याबद्दल मुख्य निवडकर्त्यांनी केला मोठा खुलासा