इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेत भारतीय संघ २-१ अशा आघाडीवर आहे. मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताने इंग्लंडला १५७ धावांनी मात दिली. मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना १० सप्टेंबरपासून मँचेस्टरमध्ये खेळला जाणार आहे. मालिका वाचवण्यासाठी इंग्लंडच्या संघाला पाचवा सामना जिंकणे गरजेचे आहे. अशातच इंग्लंडचे वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि ओली राॅबिन्सन यांच्या चौथ्या सामन्यातील उपस्थितीवर संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, मालिकेत ओली राॅबिन्सनने २१ आणि जेम्स अँडरसनने १५ विकेट्स घेतल्या आहेत.
इंग्लंड कर्णधार जो रुटच्या मते संघ व्यवस्थापन या दोन गोलंदाजांना खेळवण्याबद्दल विचार करेल. अँडरसन आणि रॉबिन्सन यांना ओव्हल कसोटीत केलेल्या ९६.३ षटकांच्या गोलंदाजीच्या भारातून सावरावं लागेल. त्यांच्याकडे यासाठी कमी कालावधी आहे
जो रूट या दोघांविषयी बोतलाना म्हणाला, “अँडरसन आणि राॅबिन्सनविषयी माहिती आम्ही पुढच्या काही दिवसात देऊ. हे दोन दिवस सावरण्यासाठी महत्वाचे आहेत आणि हे सुनिश्चित करतात की, ते कसोटी सामन्यात खेळण्याच्या स्थितित आहेत की नाही. आम्हाला त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल. याव्यतिरिक्त आम्हाला त्यांच्याशी बोलावे लागेल, ते त्यांच्या शरीराला चांगले ओळखतात.”
जाॅस बटलर त्याच्या दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर इंग्लंडच्या संघात पुन्हा परतणार आहे, कर्णधार जो रूटने या गोष्टीची पुष्टी केली आहे. याचाच अर्थ असा होतो की, बेयरस्टो किंवा ओली पोप यांना मँचेस्टर कसोटीत बाहेर बसावे लागणार आहे. रूट म्हणाला, “जाॅस संघाचा उपकर्णधार आहे. तो आमच्या संघाचा अविभाज्य घटक आहे. मला माहित आहे की त्याचे आउटपुट, धावांच्या बाबतीत जास्त नाहीये, जेवढे असायला हवे. पण आम्हाला माहित आहे तो किती महान खेळाडू आहे. जाॅस उपकर्णधाराच्या रूपात परत येईल आणि तो यष्टीरक्षणही करेल.”
दरम्यान, भारत आणि इंग्लंडच्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता. लाॅर्ड्सवरील दुसरा कसोटी सामना भारतीय संघाने १५१ धावांनी जिंकला. तसेच मालिकेतील तिसरा लीड्सवरील कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताला १ डाव आणि ७६ धावांनी पराभूत केले. त्यानंतर ओव्हलवर झालेल्या चौथ्या सामन्यात भारताने इंग्लंडला १५७ धावांनी हरवले. त्यामुळे मालिकेत सध्या भारत २-१ अशा आघाडीवर आहे.
त्यामुळे अखेरचा सामना निर्णायक आहे. भारताला हा सामना जिंकून किंवा अनिर्णित राखून मालिका आपल्या नावावर करायची आहे, तर इंग्लंडला मालिकेतील पराभव टाळण्यासाठी या सामन्यात विजय मिळवायचा आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
चार वर्षांनंतर भारताच्या टी२० संघातील अश्विनच्या निवडी मागचे खरे कारण आले समोर
लवकरच गांगुलीची ‘दादागिरी’ दिसणार रुपेरी पडद्यावर; ट्विट करत दिली खूशखबर
तालिबानकडून महिला क्रिकेटला विरोध होत असल्याचे पाहून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिली मोठी धमकी