---Advertisement---

जेम्स अंडरसनच्या चतुर गोलंदाजीने ‘दादा’ला केलं इंप्रेस, व्हिडिओ शेअर करत उधळली स्तुतीसुमने

On: शुक्रवार, जून 3, 2022 11:57 AM
Anderson-Ganguly-Video
---Advertisement---

न्यूझीलंड क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. ते इंग्लंड विरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहेत. त्यातील पहिल्या कसोटीला गुरुवारी (२जून) सुरुवात झाली असून हा सामना लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलीयमसन याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्या चांगलाच अंगलट आल्याचे दिसून आले. त्यांचे फलंदाज इंग्लंडच्या गोलंदाजीसमोर टिकूच शकले नाहीत. त्यांचा पहिला डाव १३२ धावांतच आटोपला.

या सामन्यात सर्वात अधिक जेम्स अँडरसनने (James Anderson) न्यूझीलंडच्या फलंदाजांना त्रास दिला. त्याने चार विकेट्स घेतले. दरम्यान त्याने एक विकेट घेण्यासाठी असा काही चेंडू फेकला, ज्याने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनाही प्रभावित केले आहे.

या सामन्यादरम्यान अँडरसनचे तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर सलामीवीर विल यंगला (Will Young) बाद करत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. हा चेंडू यंगच्या बॅटची कड लागून स्लीपमध्ये असलेल्या खेळाडूकडे गेला. तेव्हा तिसऱ्या स्लिपमध्ये उभा असलेल्या जॉनी बेयरस्टोने डाव्या बाजूला झूकत हा झेल पकडला.

हा चेंडू पाहून भारतीय नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीही खूष झाले आहेत. “त्यांनी कसोटी सामन्याच्या सुरुवातीलाच लाल चेंडू स्विंग होत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ही एक चांगली बाब आहे”, असे कॅप्शन देत गांगुली यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेयर केला आहे.

गांगुली आणि अँडरसन यांनी सोबत अनेक कसोटी सामने खेळले आहेत. अँडरसनने गांगुलीच्या सात वर्षानंतर कसोटीमध्ये पदार्पण केले. तर गांगुली यांनी २००८मध्ये कसोटीमधून निवृत्ती घेतली.
अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड या दोघांनाही विंडीज विरुद्धच्या कसोटी मालिकेत संघात घेतले नव्हते. कर्णधार बेन स्टोक्स आणि मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांनी या महान गोलंदाजांची संघात परत निवड केली आहे.
अँडरसनने न्यूझीलंड विरुध्दच्या सामन्यात यंग, टॉम लॅथम, टीम साऊदी आणि कायले जेमिसन यांना बाद करत संघात धमाकेदार पुनरागमन केले आहे. ३९ वर्षीय अँडरसनसाठी कसोटी क्रिकेट विशेष आहे. त्याने १७० कसोटीमध्ये खेळताना ६४४ विकेट्स घेतल्या आहेत.
दोन्ही संघांची गोलंदाजी अप्रतिम ठरली आहे. इंग्लंडनेही पहिल्या डावात ३६ षटकात ७ विकेट्स गमावत ११७ धावा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---