---Advertisement---

न्यूझीलंडच्या खेळाडूचा लाजवाब पराक्रम; सचिन, पॉटिंग, डिविलियर्स यांनाही पुरून उरला

On: सोमवार, जून 27, 2022 7:41 PM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात हेंडिग्ले, लीड्स येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने ७ विकेट्सने विजय मिळवला आहे. या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांबरोबरच गोलंदाजांनीही मोठे शॉट्स मारले आहेत. न्यूझीलंडने हा सामान गमावला असला तरी त्यांच्या गोलंदाजाने एक मोठा पराक्रम करत मोठ्या फलंदाजांना मागे पाडले आहेत. संघासाठी त्याने २९ चेंडूत ३३ धावा करत पाच चौकार आणि एक षटकार फटकारला आहे. या षटकाराने त्याने क्रिकेटमधील अनेक मोठी नावे मागे टाकली आहेत.

न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज टीम साउदी (Tim Southee) याने पहिल्या डावात ही कामगिरी केली आहे. त्याने मारलेल्या या षटकारामुळे त्याच्या कसोटीमधील षटकारांची संख्या ७६ झाली आहे. याबरोबर त्याने भारताचा दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार रिकी पॉटींग (Rickey Ponting) आणि दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज-यष्टीरक्षक एबी डिविलियर्स यांना मागे टाकले आहे. त्याने ८८ कसोटी सामने खेळताना १८५५ धावा केल्या आहेत. यामध्ये ५ अर्धशतके, १४७ चौकार आणि ७६ षटकारांचा समावेश आहे.

भारताचा माजी कर्णधार तेंडुलकरने २०० कसोटी सामन्यात ५१ शतके आणि ६८ अर्धशतके करताना ६९ षटकार मारले आहेत. क्रिकेटविश्वातील ऑस्ट्रेलियाचा यशस्वी कर्णधार पॉटिंगने १६८ कसोटीमध्ये ७३ षटकार मारले आहेत. त्याने ४१ शतके आणि ६२ अर्धशतके केली आहेत. डिविलियर्सने ११४ कसोटी सामने खेळले असून यामध्ये त्याने ६४ षटकार मारले आहेत.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम न्यूझीलंड संघाचा माजी कर्णाधार आणि सध्या इंग्लंड संघाचा प्रशिक्षक असलेल्या ब्रेंडन मॅक्युलमच्या नावावर आहे. त्याने १०१ कसोटी सामने खेळताना १०७ षटकार मारले आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक ऍडम गिलक्रिस्ट आणि इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स हे आहेत. या दोघांनी प्रत्येकी १०० षटकार फटकारले आहेत. वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने ९८ आणि दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसने ९७ षटकार मारले आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

रोहितच्या अनुपस्थितीत ‘हा’ खेळाडू चांगले नेतृत्व करेल, पाकिस्तानी दिग्गज म्हणतोय बुमराह-पंत नको

चाळिशीतही ‘या’ क्रिकेटरने दाखवली चित्त्याची चपळाई, हवेत झेप घेत पकडला अफलातून कॅच, Video Viral

Prize Money | रणजी विजेत्या मध्य प्रदेशला मिळाले ‘डबल प्राइस’, तर उपविजेत्या मुंबईच्या खिशातही १ कोटी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---