पाकिस्तान-इंग्लंड यांच्यातल्या कसोटी मालिकेतील पहिला सामना मुलतान येथे खेळला गेला. हा सामना खूपच ऐतिहासिक ठरला. या सामन्यादरम्यान अनेक मोठे रेकॉर्ड बनले आणि अनेक रेकॉर्ड मोडल्या गेले. विशेषतः इंग्लंडनं या सामन्यात विक्रमांची मालिका रचली. पाकिस्तानला डावानं पराभूत करण्याबरोबरच इंग्लंडनं अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले.
इंग्लंडनं या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा एक डाव आणि 47 धावांनी पराभव केला. सामन्याच्या शेवटच्या दिवशी पाकिस्तान दुसऱ्या डावात 222 धावांवर सर्वबाद झाला. अशाप्रकरे इंग्लंडनं जबरदस्त विजयाची नोंद करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. मुलतान कसोटी सामन्यादरम्यान कोण-कोणते मोठे विक्रम झाले, हे आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे सांगतो.
(1) पहिल्या इनिंगमध्ये 500 धावा केल्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये डावानं पराभव स्वीकारणारा पाकिस्तान हा पहिला संघ ठरला आहे. तर पहिल्या डावात 500 हून अधिक धावा करूनही पाकिस्तानला 5 वेळा पराभव पत्करावा लागला आहे.
(2) पाकिस्तानचा या सामन्यात एक डाव आणि 47 धावांनी पराभव झाला. घरच्या मैदानावरील त्यांचा हा पाचवा सर्वात मोठा पराभव आहे.
(3) पाकिस्ताननं 2022 पासून घरच्या मैदानावर एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. या कालावधीत पाकिस्ताननं 7 कसोटी गमावल्या असून 4 सामने अनिर्णित राहिले आहेत.
(4) या सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांनी 150 षटकं टाकली, ज्यापैकी ते केवळ एकच षटक मेडन म्हणून टाकू शकले. कसोटी क्रिकेटमधील हा नवा विक्रम आहे.
(5) कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या इनिंगमध्ये 500 हून अधिक धावा करूनही संघानं डावानं सामना गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे. हा लज्जास्पद विक्रम पाकिस्तानच्या नावावर नोंदवण्यात गेलाय. पाकिस्ताननं पहिल्या डावात 556 धावा केल्या होत्या, परंतु असं असतानाही त्यांना डावाच्या फरकानं सामना गमवावा लागला.
हेही वाचा –
3 खेळाडू ज्यांना न्यूझीलंड कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात संधी मिळण्याची शक्यता
WTC गुणतालिकेत पाकिस्तान तोंडघशी! इंग्लंडविरुद्ध पराभवानंतर वाईट परिस्थिती, भारताचं स्थान जाणून घ्या
पाकिस्तानची घरच्या मैदानावर फजिती, पहिल्या डावात 556 धावा करूनही लाजिरवाणा पराभव