बर्मिंघम | इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात बर्मिंघमच्या ऍजबस्टन येथे शनिवारी (०९ जुलै) दुसरा टी२० सामना खेळला जाणार आहे. ३ सामन्यांच्या या टी२० मालिकेतील पहिला सामना ५० धावांनी जिंकत भारतीय संघ या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. अशात हा सामना जिंकत मालिकेत पुनरागमन करण्याचा मानस यजमानांचा असेल.
या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी संध्याकाळी ६.३० वाजता नाणेफेक झाली असून इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली आहे. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरेल.
Two changes to our XI and a debut for @ricgleeson! 👏
Jos wins the toss and we will bowl first.
🏴 #ENGvIND 🇮🇳 | @vitality_uk
— England Cricket (@englandcricket) July 9, 2022
इंग्लंडच्या संघात दोन प्रमुख बदल करण्यात आला आहे. इंग्लंडकडून ३४ वर्षीय रिचर्ड ग्लीसनला अंतिम एकादशमध्ये संधी देण्यात आली आहे. हा त्याचा पदार्पणाचा आंतरराष्ट्रीय सामना असेल. त्याला टायमल मिल्सच्या जागी संधी दिली गेली आहे. तसेच डेविड विली रीस टोपलेच्या जागी खेळणार आहे. तर भारतीय संघात विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा आणि रिषभ पंत यांचे पुनरागमन झाले आहे. त्यांना पहिल्या टी२० सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली होती.
England have won the toss and elect to bowl first in the 2nd T20I
A look at our Playing XI for the game 👇👇
Live – https://t.co/o5RnRVGuWv #ENGvIND pic.twitter.com/SkEUSwtzVW
— BCCI (@BCCI) July 9, 2022
असे आहेत दोन्हीही संघ-
भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल
इंग्लंडचा संघ: जेसन रॉय, जोस बटलर (यष्टीरक्षक/कर्णधार), डेविड मलान, लियाम लिविंगस्टोन, हॅरी ब्रूक, मोईन अली, सॅम करन, डेविड विली, ख्रिस जॉर्डन, रिचर्ड ग्लीसन, मॅथ्यू पार्किन्सन
महत्त्वाच्या बातम्या-
‘टी२० विश्वचषकानंतर बरेच खेळाडू निवृत्त होऊ शकतात’, ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचचे मोठे संकेत
सात महिन्यांत सात कर्णधार! नेमके असे का झाले सौरव गांगुलीनेच केला खुलासा
विराट अन् रोहितमध्ये रंगणार वरचढ ठरण्याची जंग! कोण बनणार खास ‘त्रिशतका’चा पहिला मानकरी?