भारत-इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा निसटता पराभव झाला.
आता पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा सामना ९ ऑगस्टपासून लंडन येथील लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे.
या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ लंडनमध्ये दाखल झाल्यानंतर चायनामन गोलंदाज कुलदीप यादवे सोमवारी (६ ऑगस्ट) त्याचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता.
https://www.instagram.com/p/BmIix0BBsUr/?taken-by=kuldeep_18
कुलदीपच्या या फोटोवर हिटमॅन रोहित शर्माने मजेशीर कमेंट करत कुलदीपची जोरदार थट्टा केली आहे.
“तू इंग्लंडमध्ये फक्त फोटोच काढ.” असे रोहित त्याच्या कमेंटमध्ये म्हणाला.
त्यावर कुलदीपने टीम इंडियातील आपला वरिष्ठ सहकारी आणि कसोटी संघात नसल्यामुळे भारतात परतलेल्या रोहितची कुलदीपला कमतरता जाणवत असल्याची कमेंट केली.
गेल्या वर्षभरात मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यामुळे कुलदीपला भारतीय कसोटी संघात स्थान मिळाले आहे.
तर दुसरीकडे रोहितला कसोटी क्रिकेटमधील खराब कामगिरीमुळे भारतीय कसोटी संघातून वगळण्यात आले आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
-कपिल देव शतकात एकदाच जन्माला येतो