इंग्लंडनं अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी अनेक वरिष्ठ खेळाडूंना संघातून बाहेरचा रस्ता दाखवला आणि युवा खेळाडूंना संधी दिली. वगळण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये अष्टपैलू मोईन अलीचाही समावेश होता. यानंतर आता त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मोईन अली इंग्लंडसाठी दीर्घकाळ क्रिकेट खेळला. मात्र आता फारशी संधी मिळत नसल्यामुळे त्यानं आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात आणली आहे.
मोईन अलीनं यापूर्वीच कसोटी क्रिकेटला अलविदा केला होता. त्यानं एकदा नव्हे तर दोनदा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र तो इंग्लंडसाठी मर्यादित षटकांचं क्रिकेट खेळत होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी संघातून वगळल्यानंतर मोईननं मोठा निर्णय घेत निवृत्ती जाहीर केली.
निवृत्तीनंतर बोलताना मोईन अली म्हणाला की, इंग्लंडसाठी खेळणे हे त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस होते, परंतु आता संघाला पुढे जाण्याची गरज आहे. तो म्हणाला की त्यानं निवृत्ती यासाठी घेतली नाही की तो खेळण्यासाठी फिट नाही. त्यानं संघाला पुढे जाण्यासाठी हा निर्णय घेतला.
मोईन म्हणाला, “मी आणखी काही दिवस थांबून पुन्हा इंग्लंडसाठी खेळण्याचा प्रयत्न करू शकेन. पण मला माहित आहे की मी असं करणार नाही. निवृत्ती घेतल्यानंतर मला असं वाटत नाही की मी खेळण्यासाठी फिट नाही. मी अजूनही खेळू शकतो. परंतु मला माहित आहे संघाला पुढे जाण्याची आवश्यकता आहे.”
2014 मध्ये इंग्लंडसाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या मोईन अलीनं तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 298 सामने खेळले. त्यानं फलंदाजीत 6678 धावा केल्या, तर गोलंदाजीत 366 विकेट्स घेतल्या. मोईननं आपल्या ऑफ स्पिननं जगातील भल्या-भल्या फलंदाजांना अडचणीत आणलं होतं. यामध्ये भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचं नाव प्रामुख्यानं घेतलं जातं. कोहलीनं मोईनविरुद्ध खूप संघर्ष केला आहे. तो तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 10 वेळा मोईनचा बळी ठरला. मोईनने कसोटीत सर्वाधिक 6 वेळा कोहलीची विकेट घेतली आहे.
हेही वाचा –
काय सांगता! वेगवान गोलंदाज अचानक बनला स्पिनर, खेळाडू-कोच कोणाचाच विश्वास बसेना
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताची गरुडझेप, भालाफेकीत सिल्वरचं रुपांतर गोल्डमध्ये
‘पीसीबीच्या अधिकाऱ्यांना खोलीत बंद करून मुशीर खानची खेळी दाखवण्याची गरज’, दिग्गजाच्या कानपिचक्या