---Advertisement---

लॉर्ड्समध्ये दिवंगत वॉर्नला दिली गेली खास श्रद्धांजली, २३ सेकंद स्टेडियममध्ये झाला टाळ्यांचा गजर

Tribute-To-Warne
---Advertisement---

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना लॉर्ड्स येथे गुरुवारीपासून (०२ जून) खेळवला जात आहे. पहिल्या दिवसाखेर इंग्लंडचा संघ ७ बाद ११६ धावांवर खेळत आहे. ते अजून न्यूझीलंडपेक्षा १६ धावांनी पिछाडीवर आहेत. पहिल्या दिवसाचा खेळ सुरू असताना लॉर्ड्सच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा दिवंगत क्रिकेटपटू शेन वॉर्न याला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.

शेन वॉर्नला खास पद्धतीने वाहिली गेली श्रद्धांजली
इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ) संघांच्या खेळाडूंनी मिळून खास अंदाजात दिग्गज क्रिकेटपटू वॉर्नला (Shane Warne) श्रद्धांजली वाहिली (Tribute To Shane Warne) आहे. वॉर्न २३ क्रमांकाची जर्सी घालून खेळायचा. त्यामुळे डावातील २३ व्या षटकानंतर सामना थांबवण्यात आला व खेळाडूंसह स्टेडियममध्ये उपस्थित सर्वांनी वॉर्नला श्रद्धांजली दिली. २३ व्या षटकानंतर २३ सेकंद खेळ थांबवून सर्वांनी टाळ्याचा गजर केला. उभय संघांचेही खेळाडूही एका रांगेत उभे राहून टाळ्या वाजवताना दिसले. यावेळी स्टेडियममधील मोठ्या स्क्रिनवर वॉर्नचा व्हिडिओही दाखवण्यात आला. 

हा क्षण कॅमेरात कैद झाला असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मोठ्या प्रमाणात या व्हिडिओला पसंती दर्शवली जात आहे. ४ मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने वॉर्नचा आकस्मिक मृत्यू झाला होता.

पहिल्या कसोटी सामन्याची स्थिती
दरम्यान इंग्लंड आणि न्यूझीलंड संघात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळत आहे. प्रथम फलंदाजी करताना पाहुणा न्यूझीलंडचा संघ १३२ धावांवरच गारद झाला. न्यूझीलंडकडून कॉलिन डी ग्रँडहोमने सर्वाधिक ४२ धावा केल्या. तसेच टीम साउदीने २६ धावा जोडल्या. इतर कोणत्याही खेळाडूला २० धावांचा आकडाही गाठता आला नाही. कर्णधार केन विलियम्सनने तर २ धावांवर विकेट गमावली. या डावात इंग्लंडकडून जेम्स अंडरसन आणि पदार्पणवीर मॅटी पॉट्सने प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरात इंग्लंडच्या फलंदाजांनीही न्यूझीलंडच्या गोलंदाजांपुढे नांग्या टाकल्या. सलामीवीर झॅक क्राउले (४३ धावा) आणि ऍलेक्स लीस (२५ धावा) यांच्याव्यतिरिक्त इतर कोणताही फलंदाज २० धावांपर्यंत पोहोचू शकला नाही. पहिल्या दिवसाखेर इंग्लंडचा संघ ३६ षटकात ७ बाद ११६ धावांवर खेळत आहे. बेन फोक्स आणि स्टुअर्ट ब्रॉड फलंदाजी करत आहेत.

महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

वाढदिवस विशेष: गल्ली क्रिकेटर ते सुलतान ऑफ स्विंग कसा झाला अक्रम?

जेव्हा तब्बल ४२ चौकारांसह विवियन रिचर्ड्स यांनी ठोकले होते तुफानी त्रिशतक, वाचा त्या खास खेळीबद्दल

IREvIND। आयपीएलमध्ये फ्लॉप ठरूनही ‘या’ तिघांना मिळू शकते टीम इंडियात संधी, यादीत अविश्वसनीय नावांचा समावेश

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---