श्रीलंकेविरूद्ध खेळल्या जाणार्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडने आपल्या संघाची घोषणा केली आहे. या मालिकेसाठी इंग्लंडच्या निवड समितीने १६ खेळाडूंच्या संघाची घोषणा केली असून, मार्च महिन्यात भारताविरुद्ध खेळलेल्या संघातील बहुतांशी खेळाडू संघात कायम आहेत.
देशांतर्गत क्रिकेट गाजवणारा डावखुरा युवा वेगवान गोलंदाज जॉर्ज गार्टनचा प्रथमच इंग्लंडच्या संघात समावेश करण्यात आला आहे. प्रमुख अष्टपैलू बेन स्टोक्स व अव्वल वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांच्या नावाचा या मालिकेसाठी देखील विचार करण्यात आला नाही. ते सध्या दुखापतीतून सावरत आहेत. श्रीलंकाविरुद्धच्या या मालिकेला २९ जूनपासून सुरूवात होईल.
तीन सामन्यांची होणार मालिका
तीन वनडे सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना २९ जून रोजी खेळला जाईल. दुसरा सामना १ जुलैला तर तिसरा सामना ४ जुलै रोजी खेळला जाईल. ओएन मॉर्गनच संघाचे नेतृत्व करेल. त्याच्या सोबतीला फलंदाजीमध्ये जॉनी बेअरस्टो, जेसन रॉय, सॅम बिलिंग्ज, जोस बटलर, जो रूट यांचा संघात समावेश आहे. अष्टपैलू म्हणून सॅम करन व मोईन अली कामगिरी पार पडतील.
वेगवान गोलंदाजीची धुरा वाहण्यासाठी टॉम करन व मार्क वुड यांना संघात ठेवण्यात आले आहे. आदिल रशीद संघातील एकमेव तज्ञ फिरकीपटू असेल.
या वनडे मालिकेपूर्वी उभय संघांमध्ये २३ जूनपासून तीन सामन्यांची टी२० मालिका देखील खेळली जाणार आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंड संघ-
ओएन मॉर्गन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, मोईन अली, सॅम बिलिंग्ज, जोस बटलर, सॅम करन, टॉम करन, लियाम डॉसन, लियाम लिव्हिंगस्टोन, जो रूट, जॉर्ज गार्टन, जेसन रॉय, डेव्हिड विली, आदिल राशिद , ख्रिस वोक्स, मार्क वुड.
इंग्लंड विरुद्ध श्रीलंका वनडे मालिका कार्यक्रम
पहिला वनडे सामना- २९ जून, चेस्टर ली स्ट्रीट
दुसरा वनडे सामना- १ जुलै, ओव्हल
तिसरा वनडे सामना- ४ जुलै, ब्रिस्टल
महत्त्वाच्या बातम्या –
WTC फायनलसाठी मैदानात उतरताच विराट बनला ‘असा’ कारनामा करणारा जगातील एकमेव खेळाडू
“रिषभ पंतने तसा फटका मारला तर हा माझा अपमान”
‘त्या’ कृत्यामूळे घडले सिराजच्या माणुसकीचे दर्शन, व्हिडिओ होतोय व्हायरल