---Advertisement---

अन् थोडक्यात वाचला पुजारा, वॅग्नरने टाकलेला चेंडू आदळला हेल्मेटवर; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा क्षण

On: रविवार, जून 20, 2021 2:20 AM
---Advertisement---

साऊथॅम्पटन। शनिवारपासून (१९ जून) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला सुरुवात झाली. खरंतर हा सामना शुक्रवारी सुरु होणार होता. मात्र, पावसाच्या व्यत्ययामुळे शुक्रवारी नाणेफेकही होऊ शकली नाही. पण शनिवारी वातावरणात बदल झाल्याने सामना नियोजित वेळेत सुरु झाला. दरम्यान, शनिवारी फलंदाजी करताना भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजारा दुखापत होण्यापासून थोडक्यात बचावला.

थोडक्यात वाचला पुजारा
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिल सलामीला फलंदाजीसाठी उतरले. त्यांनी चांगली सुरुवात करताना ६२ धावांची सलामी दिली. त्यानंतरचा डाव विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराने सांभाळला होता.

पण, यादरम्यान ३७ व्या षटकात न्यूझीलंडकडून गोलंदाजी करणाऱ्या नील वॅग्नरचा एक चेंडू पुजाराच्या हेल्मेटवर जोरात आदळला. यावेळी पुजाराने पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो चेंडू त्याच्या हेल्मेटवर लागल्याने त्याचा सेफ्टी गार्ड निघून मैदानावर पडला. त्यामुळे एका क्षणी अनेकांच्या हृदयाचा ठोका चूकला होता. मात्र, पुजाराला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याचे समजले.

ही घटना घडल्यानंतर लगेचच भारताचे फिजिओ त्याला तपासण्यासाठी आले होते. पण पुजारा बरा असल्याने त्याने पुढे खेळणे सुरु ठेवले. यावेळी वॅग्नरनेही खिलाडूवृत्ती दाखवत पुजाराची विचारपूस केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

गिललाही लागला चेंडू
पुजारापूर्वी १७ व्या षटकात काईल जेमिसनने टाकलेला एक आखुड टप्प्याचा चेंडू शुबमन गिलच्या हेल्मेटवर आदळला होता. त्यालाही यावेळी कोणतीही मोठी दुखापत झाली नाही. पुजारा ५४ चेंडूत २ चौकारांसह ८ धावांवर ट्रेंट बोल्टच्या विरुद्ध खेळताना पायचीत झाला.

विराट-रहाणेने सांभाळला डाव
पुजारा बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या कर्णधार-उपकर्णधारांच्या जोडीने भारताचा डाव सावरला. या दोघांनी नंतर पडझड होऊ दिली नाही. शनिवारी दुसऱ्या सत्राच्या अखेरीसनंतर सातत्याने कमी प्रकाशाचा व्यत्यय येत असल्याने अखेर ६५ व्या षटकानंतर दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. भारताने शनिलारी दिवसाखेर ६४.४ षटकात ३ बाद १४६ धावा केल्या. विराट १२४ चेंडूत  ४४ धावांवर नाबाद खेळत आहे. तसेच रहाणे २९ धावांवर नाबाद आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

आयसीसी स्पर्धांच्या अंतिम सामन्यांत खेळताना विराटचा ‘मोठा’ विक्रम; गंभीर, गांगुलीला टाकलं मागे

WTC फायनलसाठी मैदानात उतरताच विराट बनला ‘असा’ कारनामा करणारा जगातील एकमेव खेळाडू

‘त्या’ कृत्यामूळे घडले सिराजच्या माणुसकीचे दर्शन, व्हिडिओ होतोय व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---