इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने १७ ऑगस्टपासून लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. यजमानांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये फक्त एक बदल केला आहे. इंग्लंडने पहिल्या कसोटीसाठी यष्टीरक्षक बेन फॉक्सचा समावेश सॅम करनच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये केला आहे.
इंग्लंडने जाहिर केलेला हा संघ एकदम मजबूत स्थितीत पाहायला मिळत आहे. शिवाय गेल्या काही कालावधीपासून इंग्लंड संघाला कसोटी क्रिकेटमध्ये कोणीही मात देऊ शकलेला नाही. त्यामुळे त्यांचा विजयरथ रोखण्याचे आव्हान दक्षिण आफ्रिकेपुढे असणार आहे.
अशी असेल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन:
झॅक क्रोली, ऍलेक्स लीस, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फॉक्स (यष्टीरक्षक), स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच, मॅथ्यू पॉट्स, जेम्स अँडरसन.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा