भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघात येत्या १ जुलै पासून पाचवा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडकडून कोणकोणते खेळाडू प्लेइंग११ मध्ये खेळणार याबाबत अनेक चर्चा सुरू होत्या अखेर या प्रश्नांची उत्तरे आता मिळाली आहेत. नुकतीच इंग्लंड संघाकडून पाचव्या कसोटीसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. या सामन्यात अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स संघाचे नेतृत्व करेल शिवाय वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन पुनरागमन करताना दिसणार आहे.
Our XI for the fifth LV= Insurance Test with @BCCI ????
More here: https://t.co/uXHG3iOVCA
???????????????????????????? #ENGvIND ???????? pic.twitter.com/xZlULGsNiB
— England Cricket (@englandcricket) June 30, 2022
नुकताच इंग्लंडचा संघ न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळून आला आहे. त्या मालिकेत इंग्लंडने न्यूझीलंड संघाचा ३-० ने धुरळा उडवला. या मालिकेत जॉनी बेयरस्टो आणि जो रुटने तुफान फलंदाजी केली होती. ते दोघेही या सामन्यात इंग्लंड संघात समाविष्ट झाले आहेत. शिवाय न्यूझीलंड मालिकेत दुखापतग्रस्त झालेला वेगवान गोलंदाड जेम्स अँडरसन देखील या सामन्यासाठी फिट असून पुनरागमन करण्यास सज्ज असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, भारताचा कर्णधार रोहित शर्मा याला कोरोनाची लागण झाली असल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यामुळे तो या सामन्यासाठी उपलब्ध असेल की नाही यावर अजून पर्यंत प्रश्नचिन्ह आहेत. याशिवाय विराट कोहली सारखा दिग्गज फलंदाज गेल्या बऱ्याच काळापासून फॉर्मविरुद्ध झुंजत आहे. त्यामुळे या सामन्यात त्याने चांगली फलंदाजी करत इंग्लंडच्या गोलंदाजांना रोखणे गरजेचे ठरणार आहे.
असा असेल भारताविरुद्ध पाचव्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ
बेन स्टोक्स (कर्णधार), ऍलेक्स लीस, झॅक क्रॉली, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलींग्स (यष्टीरक्षक), मॅथ्यू पॉट्स, स्टूअर्ट ब्रॉड, जॅक लीच, जेम्स अँडरसन
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
प्रेक्षकांना लवकरच दिसणार राहुलचा कमाल,लाजवाब अंदाज; वाचा पोस्ट करत काय म्हणाला
पाचव्या कसोटीत रोहितची जागा कोण घेणार? प्रशिक्षक द्रविडने सांगितले तीन पर्याय
भारताची चिंता वाढली, पाचव्या कसोटीत इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज करणार पुनरागमन






