---Advertisement---

लिव्हिंगस्टोनच्या तडाख्यानंतर न्यूझीलंडचा 147 धावांत उडाला खुर्दा! विली-टोप्ली चमकले

On: सोमवार, सप्टेंबर 11, 2023 10:33 AM
---Advertisement---

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानच्या पाच सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना कार्डिफ येथे खेळला गेला. पावसामुळे प्रत्येकी 34 षटकांच्या करण्यात आलेल्या सामन्यात गोलंदाजांचे चांगलेच वर्चस्व पाहायला मिळाले. इंग्लंडने लियाम लिव्हिंगस्टोनच्या शानदार खेळीच्या जोरावर उभे केलेले 227 धावांचे आव्हान पार करताना न्यूझीलंड संघाचा 147 धावांमध्ये खुर्दा उडाला. यासह यजमान संघाने मालिकेत बरोबरी साधली.

पहिल्या सामन्यात शानदार विजय मिळवलेल्या न्यूझीलंड संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पुनरागमन करत असलेल्या ट्रेंट बोल्ट याने पहिल्या पाच षटकात इंग्लंडचे तीन फलंदाज तंबूत पाठवले. त्यानंतर इंग्लंडचा निम्मा संघ 55 धावात बाद झालेला. त्यावेळी मैदानात उतरलेल्या लियाम लिव्हिंगस्टोनने जबाबदारी खांद्यावर घेत इंग्लंडचा डाव सावरला. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत 78 चेंडूंमध्ये 95 धावांची खेळी केली. त्याला सॅम करनने 42 धावा करत साथ दिली. त्यामुळे इंग्लंड संघ न्यूझीलंडसमोर विजयासाठी 227 धावांचे आव्हान ठेवू शकला.

या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडला दुसऱ्याच चेंडूवर फिन ऍलनच्या रूपाने धक्का बसला. डेवॉन कॉनवे केवळ 14 धावा करू शकला. त्यानंतर यंग याने 33 तर मिचेल याने अर्धशतकी खेळी केली. लॅथमने 19 धावांचे योगदान दिले. त्यानंतरचा एकही फलंदाज दुहेरी आकडा न‌ गाठू शकल्याने न्यूझीलंडचा संघ 147 धावा सर्वबाद झाला. इंग्लंडसाठी विली व टोप्ली यांनी प्रत्येकी तीन तर अली याने दोन बळी मिळवले. बुधवारी होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ आतुर असतील.

(England Beat Newzealand In 2nd ODI By 79 Runs Livingston Shines)

महत्वाच्या बातम्या – 
“तुझा शहजादा नवा बुमराह होईल”, बाबा बनलेल्या जस्सीला शाहिनच्या शुभेच्छा, पाहा अप्रतिम व्हिडिओ
पाचव्या राष्ट्रीय व्हिलचेअर रग्बी स्पर्धेत महाराष्ट्र, बिहार, राजस्थान, कर्नाटक संघांची विजयी सलामी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---