वनडे विश्वचषक 2023 मध्ये बुधवारी (8 नोव्हेंबर) इंग्लंड आणि नेदरलँड्स यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. पुणे येथील एमसीए स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात इंग्लंड संघाने वर्चस्व गाजवले. बेन स्टोक्स याने झळकावलेल्या शतकानंतर गोलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने 160 धावांनी विजय साजरा केला. या विजयासह इंग्लंडचे चॅम्पियन ट्रॉफी 2025 साठीचे आव्हान कायम राहिले आहे.
https://www.instagram.com/p/CzY_sHlxX4Y/?igshid=MTkzMDUyN2VnNjZ0MQ==
स्पर्धेतील आव्हान यापूर्वी संपुष्टात आलेल्या इंग्लंड व नेदरलँड्ससाठी आपले अखेरचे दोन सामने प्रतिष्ठेचे होते. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला. डेव्हिड मलान याने 87 धावा करून केलेल्या सुरुवातीनंतर बेन स्टोक्स व ख्रिस वोक्स यांनी अनुक्रमे 108 व 51 धावा करत संघाला 339 पर्यंत नेले. नेदरलँड्स संघासाठी अष्टपैलू बास डी लिडे याने सर्वाधिक तीन बळी मिळवले.
विजयासाठी मिळालेल्या 340 धावांचा पाठलाग करताना नेदरलँड्स आम्हाला नियमित अंतराने धक्के बसले. दोन्ही सलामीवीर स्वस्तात परतल्यानंतर वेस्ली बारेसी व सायब्रंड यांनी अर्धशतकी भागीदारी करत डाव सावरला. मात्र, ते बाद झाल्यानंतर कर्णधार स्कॉट एडवर्ड्स वगळता कोणीही संघर्ष करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचा डाव 179 धावांवर समाप्त झाला. इंग्लंडसाठी मोईन अली याने सर्वाधिक तीन बळी मिळविले. इंग्लंड आपला अखेरचा सामना पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे.
(England Best Netherlands By 160 Runs In 2023 ODi World Cup Ben Stokes Century Heroics)
हेही वाचा-
सत्ता आपलीच! नव्या गोलंदाजी क्रमवारीत टीम इंडियाचा पूर्ण तोफखाना ‘टॉप 10’मध्ये! सिराज पुन्हा नंबर वन
हा वर्ल्डकप विक्रमांचा! 48 वर्षांच्या इतिहासात कुठल्याच हंगामात न घडलेला रेकॉर्ड CWC 2023मध्ये घडला, वाचाच