---Advertisement---

टी२० मालिकेत संघाबाहेर ठेवलेला ‘हा’ दिग्गज संपवणार इंग्लंडच्या पराभवाची साडेसाती, टीम इंडियाचं नमोहरण करायला झालाय सज्ज

On: मंगळवार, मार्च 23, 2021 11:17 AM
---Advertisement---

भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत इंग्लंडचा पराभव झाला. यजमानांनी इंग्लंडला 3-2 असे हरवले. आता मंगळवार (23 मार्च) पासून या दोन संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका रंगणार आहे. तत्पुर्वी इंग्लंडचा कर्णधार ऑयन मॉर्गन याने संपूर्ण टी-20 मालिकेत बाकावर बसलेला खेळाडू मोईन अली याला खेळवणार असल्याचे संकेत दिले आहेत.

पहिल्या वनडे सामन्यापुर्वी मॉर्गनने सांगितले की, “मला माहित आहे मोईनला याअगोदर संधी मिळाली नाही. कारण आम्ही खेळलेल्या खेळपट्ट्यांवर चेंडू जास्त वळण घेत नव्हता. म्हणून फिरकीपटूंना टी२० संघात जास्त संधी देण्यात आली नव्हती. मात्र पुण्यातील खेळपट्टी पाहता मोईनला आजमावण्याचा आम्ही विचार करू.”

इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूटला एकदिवसीय सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आल्याबद्दल विचारले असता मॉर्गन म्हणाला की, “रुटच्या न खेळण्यामुळे संघात फलंदाजांची संख्या कमी झाली आहे. तो जवळजवळ प्रत्येक चेंडूवर धावा करत असतो. त्याची सरासरी 50 च्या आसपास आहे. तो एक उत्तम खेळाडू असून वनडेत त्याची कमी आम्हाला जाणवणार आहे.”

टी२० विश्वचषकाबद्दल मॉर्गन म्हणाला..
भारताविरूद्धची कसोटी आणि टी-२० मालिका इंग्लंड संघासाठी चांगला धडा होता. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडची पकड कायम राहील.

याबद्दल मॉर्गनने सांगितले की, “टी -२० विश्वचषक यावर्षी भारतात होणार आहे. म्हणूनच, विश्वचषकातील सामन्यांसाठी खेळाडूंना संघात आपले स्थान निश्चित करण्यासाठी ही नामी संधी आहे. टी-२० विश्वचषक जवळ आला आहे आणि अशा परिस्थितीत त्या खेळाडूंसाठी कोणत्याही प्रकारचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे ही मोठी संधी असेल, ज्यांना संघात स्थान मिळाले नाही. त्यांनी परदेशात धावा करून किंवा विकेट घेवून आपली छाप सोडावी. एकदिवसीय क्रिकेट हे अगदी टी-२० क्रिकेट सारखेच आहे. दोन्हीमध्ये समान्यांमध्ये समान परिस्थिती उद्भवते.”

महत्त्वाच्या बातम्या-

कुछ तो लोग कहेंगे..! केएल राहूलच्या टीकाकारांना कर्णधार विराटचे ‘फिल्मी स्टाइल’ प्रत्युत्तर

एकाची फलंदाजी तर दुसऱ्याची गोलंदाजी, पुणे वनडेत ‘हे’ दोन शिलेदार इंग्लंडसाठी कर्दनकाळ

“सूर्यकुमार यादवला वनडेत संधी देण्यासाठी वाटेल ते करण्यास तयार”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---