इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सत्रात सॅम करनने चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना शानदार प्रदर्शन केले होते. मात्र या हंगामात एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखाली खेळणारा चेन्नई संघ चांगली कामगिरी बजावू शकला नाही. परंतु करनने बर्याच प्रसंगी दाखवून दिले आहे की, त्याच्यामध्ये कोणत्याही क्रमांकावर खेळण्याची क्षमता आहे. धोनीने फलंदाजीच्या क्रमवारीत इंग्लंडच्या या अष्टपैलू खेळाडूला कधी वरच्या क्रमांकावर तर कधी फिनिशरच्या भूमिकेत खेळण्याची संधी दिली.
भारत विरुद्ध इंग्लड यांच्या दरम्यान झालेल्या एकदिवसीय मालिकेच्या तिसर्या आणि शेवटच्या सामन्यात तो फिनिशरच्या भूमिकेत दिसला. त्याने सामन्याखेर इंग्लंडच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. भारताने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला 330 धावांचे लक्ष दिले. परंतु इंग्लंडच्या संघाने 200 धावांतच आपले सात गडी गमावले होते. इंग्लंडला विजयासाठी अजून 130 धावांची गरज होती.
असे असताना सॅम करनने हार मानली नाही आणि मैदानावर टिकून राहिला. त्याने खालच्या फळीतील फलंदाजांसह इंग्लंडची धावसंख्या पुढे नेली. सामन्याखेर तो 83 चेंडूत 95 धावांवर नाबाद राहिला. यादरम्यान त्याने 3 षटकार आणि 9 चौकारही लगावले. परंतु संघाला सामना जिंकून देण्यात मात्र तो अपयशी ठरला. भारताने अवघ्या सात धावांनी हा सामना जिंकला.
सामन्यानंतर इंग्लंडचा संघनायक जोस बटलर याने सॅम करनचे तोंडभरून कौतुक केले. सॅम करनमध्ये एमएस धोनीची झलक पाहायला मिळाली असल्याचे बटलरने सांगितले.
स्पोर्टकीडाशी बोलताना बटलर म्हणाला की, “मला पूर्ण विश्वास आहे की सॅम आजच्या खेळीनंतर धोनीशी बोलू इच्छित असेल. तो ज्याप्रकारे खेळत होता. ते पाहून धोनीची आठवण झाली. धोनीही अशा परिस्थितीत संघाची खिंड लढवताना बऱ्याचदा दिसला आहे. आजच्या सामन्याविषयी चर्चा करण्यासाठी धोनी हाच सॅमसाठी सर्वोत्त्कृष्ट व्यक्ती असेल. आपणा सर्वांना माहिती आहे तो एक चांगला क्रिकेटपटू, फिनिशर आणि फलंदाज आहे. त्याच्यासोबत नुसती ड्रेसिंग रुम शेअर करुनही तुम्ही खूप काही शिकू शकता.”
महत्त्वाच्या बातम्या-
चाहता नंबर १! नेट गोलंदाजाने पाया पडत घेतले ‘माही’चे आशिर्वाद; पाहा तो नजरेत भरणारा क्षण
‘सिजन ऑफ लाइफटाइम’, वनडे सीरिज विजयानंतर प्रशिक्षक शास्त्रींचे मन जिंकणारे ट्विट
केएल राहुल महान फलंदाज बनण्यामागे कर्णधार कोहलीचा हात, माजी दिग्गजाचे भाष्य