इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अनेक विस्फोटक फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज दिले आहेत. फक्त भारतच नव्हे तर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेतील खेळाडूंनी देखील आयपीएल स्पर्धेत येऊन चांगली कामगिरी करून राष्ट्रीय संघात स्थान मिळवले आहे. याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे इंग्लंड संघाचा अष्टपैलू खेळाडू, सॅम करन.
सॅम करनने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना खेळातील अनेक डावपेच शिकले आहेत, ज्याचा फायदा त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना देखील झाला आहे. सध्या तो आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. अशातच इंग्लंड संघाच्या प्रशिक्षकाने सॅम करणबद्दल भाष्य केले आहे.
इंग्लंड संघाचे प्रशिक्षक ग्राहम थोर्प यांच्या म्हणण्यानुसार, सॅम करन एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू असण्याचे कारण म्हणजे आयपीएल आहे. आयपीएल स्पर्धेत तो चेन्नई सुपर किंग्स संघाचे प्रतिनिधित्त्व करतो. श्रीलंका संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत सॅम करनने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे प्रशिक्षक भलतेच खुश झाले आहेत. (England coach Graham Thorpe statement on Sam Curran)
त्यांनी ईएसपीईएन क्रिकइन्फोसोबत चर्चा करताना म्हटले की, “मला असे वाटते की, आयपीएलने त्याला खूप मदत केली आहे. सॅम करन ज्या कुठल्या परिस्थितीत खेळण्यासाठी गेला आहे तिथे त्याने चांगली कामगिरी करण्याचा मार्ग शोधला आहे. त्या दृष्टिकोनातून आयपीएलमध्ये खेळल्याने तो उच्च पातळीवर आला आहे.” ग्राहम थोर्प यांच्या मते, सॅम करन आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड संघासाठी मोलाची भूमिका बजावू शकतो.
ग्राहम थोर्प पुढे म्हणाले की, “तो बॅटने चेंडू मारण्यात आधीपासूनच सक्षम होता. मला वाटते की, आयपीएल स्पर्धेमुळे खरंच त्याचा दर्जा वाढला आहे. त्याने आयपीएलमध्ये संघ अडचणीत असताना गोलंदाजी केली आहे. अवघ्या २३ वर्षात त्याला खरंच खूप चांगले अनुभव मिळत आहेत.”
सॅम करनने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघासाठी एकूण ३० सामने खेळले आहेत. यात त्याने ३३३ धावा केल्या आहेत. यासोबतच त्याने ३२ गडी देखील बाद केले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
‘धोनी’च्या नावाने शिक्षकाच्या नोकरीसाठी अर्ज, ‘तेंडुलकर’ला बनवले वडील; अज्ञात व्यक्ती संकटात!
‘फलंदाजीवर लक्ष दिले असते तर आयपीएलमधून बक्कळ पैसा कमावला असता,’ अव्वल गोलंदाजाला खंत
ये करके दिखाओ! पठ्ठ्याने गोल फिरत उलट्या हाताने मारला जबराट शॉट, प्रसिद्ध समालोचकही फिदा