कोविड-१९ मुळे मार्च २०२० मध्ये होणारा इंग्लंडचा श्रीलंका दौरा स्थगित करण्यात आला होता. परंतु, आता पुढील महिन्यात या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. या दौऱ्यासाठी शुक्रवारी (११ डिसेंबर) इंग्लंड क्रिकेट बोर्डाने १६ सदस्यीय कसोटी संघाची घोषणा केली आहे. तर ७ राखीव खेळाडूही संघासोबत श्रीलंकाला रवाना होतील. इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात होणारी २ सामन्यांची कसोटी मालिका ही आयसीसी कसोटी चॅम्पियनशीपचा भाग असेल.
इंग्लंडच्या १६ सदस्यीय कसोटी संघात अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स आणि गोलंदाज जोफ्रा आर्चर यांना विश्रांती देण्यात आली आहे. तसेच रॉरी बर्न्स यालाही संघात स्थान देण्यात आलेले नाही. याउलट संघात जॉनी बेयरस्टो आणि मोईन अली यांचे पुनरागमन झाले आहे.
दर्शकांविना होणार सामने
नववर्षाच्या पहिल्या महिन्यात इंग्लंड आणि श्रीलंका संघ २ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहेत. या मालिकेतील दोन्ही सामने दर्शकांविना खेळले जातील. जवळपास २ जानेवारीला इंग्लंड संघ श्रीलंकाला जाण्यासाठी रवाना होईल. तर १४ जानेवारी ते १८ जानेवारी दरम्यान पहिला कसोटी सामना होईल. तसेच २२ जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान दुसरा आणि अंतिम कसोटी सामना होईल. हे दोन्ही सामने श्रीलंकाच्या गॅले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळले जातील.
We have named our squad for our men’s Test tour of Sri Lanka! 🏴🇱🇰
— England Cricket (@englandcricket) December 11, 2020
१६ सदस्यीय इंग्लंड कसोटी संघ:
जो रूट (कर्णधार), मोइन अली, जेम्स अंडरसन, जॉनी बेयरस्टो, डोम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, जोस बटलर, झॅक क्राउले, सॅम करन, बेन फोक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, डोम सिबली, ऑली स्टोन, क्रिस वोक्स, मार्क वुड
राखीव खेळाडू:
जेम्स ब्रेसी, मेसन क्रेन, साकिब महमूद, क्रेग ओवर्टन, मैथ्यू पार्किंसन, ओली रॉबिनसन, अमर विर्दी
महत्त्वाच्या बातम्या-
IND Vs AUS A : सराव सामन्याचा पहिला दिवस बुमराहच्या नावावर, भारताला मिळाली ८६ धावांची आघाडी
दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय, ‘या’ खेळाडूला सोपवले कसोटी संघाचे कर्णधारपद
“…तर मग कर्णधाराची काय गरज?” इंग्लंड संघाच्या प्लेकार्ड रणनितीवर माजी खेळाडूची सडकून टीका