बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) अडचणीत सापडला आहे. आता तो कोणत्याही स्पर्धेत गोलंदाजी करू शकणार नाही. कारण त्याच्या गोलंदाजीवर बंदी घालण्यात आली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) शाकिबची गोलंदाजी ॲक्शन बेकायदेशीर ठरवली होती. यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) रविवारी (15 डिसेंबर) याची पुष्टी केली. शाकिबच्या गोलंदाजीच्या ॲक्शनची चौकशी सुरू होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) काउंटी क्रिकेटमध्ये खेळत होता. तो सरे संघाचा भाग आहे. त्याने काउंटी क्रिकेटमधील एकमेव सामना सरेकडून सॉमरसेटविरूद्ध खेळला. या सामन्याच्या पहिल्या डावात शाकिबने 12 धावा केल्या, तर दुसऱ्या डावात तो शून्यावर बाद झाला. या सामन्यात शाकिबने शानदार गोलंदाजी केली होती. त्याने दोन्ही डावात एकूण 9 विकेट्स घेतल्या होत्या.
शाकिबच्या गोलंदाजीवर बंदी घालण्यात आली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (England Cricket Board) शाकिबची गोलंदाजी ॲक्शन बेकायदेशीर ठरवली आहे. खरे तर, त्याची ॲक्शन 15 अंशांची श्रेणी ओलांडते. इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या नियमांनुसार गोलंदाजी करताना मनगट 15 अंशांपेक्षा जास्त फिरवता येत नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
WPL Action; या 4 खेळाडूंना लिलावात लागली 1 कोटी पेक्षा जास्त बोली
SMAT Final 2024; फायनलमध्ये मध्य प्रदेशला चारली धूळ, मुंबईने पटकावले विजेतेपद
शानदार शतक झळकावल्यानंतर स्टीव्ह स्मिथ म्हणाला, “माझ्यासाठी गेली 3 वर्षे सर्वात कठीण…”