भारत आणि इंग्लंड दरम्यान पाचवा कसोटी सामना होईल की नाही? हे अद्याप स्पष्ट नाही. खरे तर, भारताच्या सपोर्ट स्टाफमधील ३ सदस्य आधीपासून कोरोना संक्रमणामुळे विलगीकरणात आहेत. त्यानंतर अजून एक सदस्य सामन्याच्या एक दिवस आधी कोरोना संक्रमित झाला आहे. त्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला एक अतिशय विचित्र ऑफर दिली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला यजमानांना मँचेस्टर कसोटीत ‘वॉकओव्हर’ देण्यास सांगितले, जे भारतीय मंडळाने सरळ नाकारले आहे.
जेव्हा भारतीय क्रिकेट बोर्डाला ही ऑफर मिळाली, तेव्हा त्यांनी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याशी या विषयावर चर्चा केली. विराट कोहली आणि रोहित शर्माने हे स्पष्टपणे नाकारले आणि सांगितले की ते कसोटी सामने खेळण्यास तयार आहेत.
भारतीय क्रिकेट संघाचे कनिष्ठ फिजिओ योगेश परमार कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत आणि यामुळे भारतीय संघाने गुरुवारी क्षेत्ररक्षणाचा सरावही केला नाही. सर्व भारतीय खेळाडू त्यांच्या खोलीत बंद आहेत आणि त्यांच्या दुसऱ्या कोरोना चाचणीच्या प्रतिक्षेत आहेत. मँचेस्टर कसोटीचे भविष्य या कोविड चाचणीच्या आधारेच ठरवले जाईल. दरम्यान, भारतीय संघाच्या काही खेळाडूंनाही विलगीकरणात पाठवले जाऊ शकते. फिजिओ योगेश परमारच्या जवळच्या संपर्कात असणाऱ्या खेळाडूंना संघातून वगळले जाऊ शकते. असे झाल्यास मँचेस्टर कसोटी रद्द देखील होऊ शकते.
बीसीसीआयचे प्रमुख सौरव गांगुली देखील मँचेस्टर कसोटीबाबत साशंक आहेत. अगदी बीसीसीआयच्या प्रमुखांनाही माहित नाही की मँचेस्टर कसोटी होईल की नाही? तसे, जर मँचेस्टर कसोटी झाली नाही, तर ही मालिका अपूर्ण मानली जाईल आणि २-१ ने आघाडीवर असलेल्या भारतीय संघाला विजेता घोषित केले जाणार नाही. नियमांनुसार, शेवटचा कसोटी सामना खेळला जाईल आणि त्या आधारावर कसोटी मालिकेतील विजेत्याचा निर्णय घेतला जाईल.
मँचेस्टरमध्ये भारताचा विक्रम अतिशय खराब आहे, या मैदानावर आतापर्यंत खेळलेल्या ९ सामन्यांमध्ये त्यांना विजय मिळवता आलेला नाही. भारताने येथे ४ सामने गमावले आहेत आणि ५ सामने अनिर्णित राहिले आहेत. मात्र, भारतीय संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे यावेळी निकाल वेगळा लागू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
ओव्हल कसोटीचा हिरो ठरलेला बुमराह अखेरच्या सामन्यात होऊ शकतो बाहेर, ‘हे’ आहे कारण
“बुमराहने मला डेल स्टेनची आठवण करून दिली”, केविन पीटरसन का म्हणाला असं, वाचा सविस्तर
‘स्वप्न पूर्ण होतात!’ टी२० विश्वचषकासाठी निवड झाल्यानंतर सूर्यकुमारची भावूक पोस्ट