न्यूझीलंड संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून या दौऱ्यात ते इंग्लंड संघाशी दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन हात करणार आहेत. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून लॉर्डस क्रिकेट मैदानावर प्रारंभ झाला. या सामन्यात नाणेफेक जिंकून पाहुण्या न्यूझीलंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
मात्र या सामन्याच्या सुरुवातीला घडलेल्या एका वेगळ्याच घटनेने क्रिकेट रसिकांचे लक्ष वेधून घेतले. नाणेफेकीनंतर सामना सुरु व्हायच्या आधी दोन्ही संघ राष्ट्रगीतासाठी मैदानात आले. त्यावेळी इंग्लंड संघाने चक्क काळ्या रंगाची जर्सी परिधान केल्याचे दिसून आले. या कृतीमागील अर्थ न कळल्याने अनेकांनी यावर आश्चर्य व्यक्त केले होते. मात्र आता इंग्लंड संघाच्या कृतीमागील नेमक्या कारणाचा खुलासा झाला आहे.
‘या’ खास कारणासाठी काळी जर्सी केली परिधान
इंग्लंड संघाने एका खास हेतूने या सामन्याच्या सुरुवातीला ही काळ्या रंगाची जर्सी परिधान केली होती. क्रिकेट जगतातील कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला विरोध करण्यासाठी म्हणून त्यांनी ही प्रतीकात्मक काळ्या रंगाची जर्सी घालण्याचा निर्णय घेतला होता. क्रिकेटमध्ये कोणत्याही भेदभावाला स्थान नसून हा खेळ सर्वांसाठी समान आहे, असा संदेश यातून इंग्लंड संघाने देण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच या खेळाडूंच्या जर्सीवर ‘क्रिकेट हा खेळ सर्वांसाठी आहे’, असा संदेश देखील लिहिलेला होता. इंग्लंड संघाने भेदभावाच्या विरोधासाठी उचललेल्या या पावलावरून क्रिकेट जगतातून त्यांचे कौतुक केले जात आहे.
A moment of unity prior to the start of proceedings to reflect the message that cricket is a sport for everyone.#LoveLords pic.twitter.com/DqQKgtcUmQ
— Lord's Cricket Ground (@HomeOfCricket) June 2, 2021
पाहुण्या संघाची सावध सुरुवात
दरम्यान, न्यूझीलंडने या सामन्यात प्रथम फलंदाजी करतांना सावध सुरुवात केली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा न्यूझीलंडने २९ षटकात २ गडी गमावून ९१ धावा केल्या होत्या. सलामीवीर टॉम लॅथम २३ धावांवर तर कर्णधार केन विलियम्सन १३ धावांवर बाद झाले होते. तर दुसरा सलामीवीर आणि पदार्पणवीर डेव कॉन्व्हॉय नाबाद ४५ आणि अनुभवी रॉस टेलर नाबाद ४ धावांवर खेळत होते. इंग्लंडकडून जेम्स एंडरसन आणि ओली रॉबिन्सनने प्रत्येकी एक बळी घेतला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
आयसीसीची नवी क्रमवारी जाहीर; विराट-रोहित या स्थानावर, तर सांघिक क्रमवारीत भारत
कमनशिबी आरसीबी! या पाच खेळाडूंना रिलीज करताच पुढच्या वर्षी त्यांनी जिंकली आयपीएल ट्रॉफी
एकेकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर जुळ्या बंधूंनी गाजवले होते अधिराज्य; साजरा करत आहेत ५६ वा वाढदिवस