इंग्लंड संघाला पहिला-वहिला आयसीसी विश्वचषक जिंकून देणाऱ्या बेन स्टोक्सने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मंगळवार (१९ जुलै) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डरहॅम येथे तो त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळणार आहे. वयाच्या ३१व्या वर्षी या क्रिकेटपटूची संपत्ती काय याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया,
क्रिकेटमध्ये डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने वेगवान गोलंदाजी करणारा बेन स्टोक्स (Ben Stokes) हा इंग्लंड क्रिकेट संघाचा हिरा आहे. तसेच तो आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळला आहे. सीए नॉलेजच्या रिपोर्टनुसार, आजच्या घडीला स्टोक्सची एकूण संपत्ती ८७.९८ कोटी रुपये एवढी आहे. क्रिकेट, आयपीएल आणि जाहीरात यांमधून त्याला उत्पन्न प्राप्त होते. मागील तीन वर्षामध्ये त्याच्या संपत्तीमध्ये ४० टक्के वाढ झाली आहे. त्यामध्ये आयपीएलचा मोठा हात आहे.
क्रिकेटचा जन्मच मुळी इंग्लंडमध्ये झाला आहे. यामुळे तेथे क्रिकेटचे चाहते मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र इंग्लंड संघाला विश्वचषक जिंकण्यात यश येत नव्हते. अशामध्ये स्टोक्सने संघाच्या मोठ्या आणि महत्वाच्या सामन्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. २०११ मध्ये वनडेत पदार्पण करणाऱ्या या खेळाडूने २०१९च्या आयसीसी विश्वचषक जिंकण्यासाठी महत्वाची भुमिका बजावली. सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याला ओळखले जाते.
बेन स्टोक्स अर्थातच बेंझामिन स्टोक्सचा जन्म ४ जून १९९१, ख्रिस्टचर्च, न्यूझीलंड येथे झाला. वयाच्या १२व्या वर्षी तो इंग्लंडमध्ये स्थायिक झाला. इथूनच त्याने क्रिकेटला सुरूवात केली आहे. स्टोक्सचा आलिशान बंगला असून त्याने अनेक देशांत रिएल इस्टेटमध्येही गुंतकणुक केली आहे. त्याची एकूण संपत्ती पाहता महिन्याचे उत्पन्न ६६ लाख रुपयांपेक्षाही अधिक आहे. तर त्याचे वार्षिक उत्पन्न जवळपास ८ कोटी रुपये एवढे आहे.
❤️???????????????????????????? pic.twitter.com/xTS5oNfN2j
— Ben Stokes (@benstokes38) July 18, 2022
स्टोक्सकडे मोजक्याच लग्झरी गाड्या असून त्यामध्ये मर्सिडीज एएम जीटी ६३, मर्सिडीज, रेंड रोव्हर, ऑडी या ब्रॅंडच्या गाड्यांचा समावेश आहे. त्याचे सरासरी उत्पन्नाबरोबरच मानधन पाहिले तर जवळपास ८० कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती असून त्यात वार्षिक उत्पन्न १३ कोटी, लग्झरी गाड्यांचे १.५ ते २ कोटी, आयपीएलच्या एका हंगामाची फी १२.५ कोटी रुपये आणि जाहीरातींमधून तो ४ कोटी रुपये कमावतो.
आयपीएल २०१७मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळताना त्याला १४ कोटी ५०लाख रुपये वेतन मिळाले होते. त्याने २०१७ ते २०२१ या काळात आयपीएलमधून ६४ कोटी ५० लाख रुपये कमावले आहेत. इंग्लंड क्रिकेट त्याला वर्षाला ८.७५ कोटी रुपये वेतन देते. त्याने कोरोनाच्या काळात काही आर्थिक मदतही दिली आहे.
स्टोक्सने त्याच्या वनडे कारकिर्दीत आतापर्यत १०४ सामन्यात खेळताना २९१९ धावा, ३ शतके, २१ अर्धशतके आणि ७४ विकेट्स घेतल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हरभजनची ‘सेकंड इनिंग’ सुरू! घेतली राज्यसभा खासदारकीची शपथ
ENGvsIND: रिषभ पंतच्या ‘या’ कृतीमुळे आली धोनीची आठवण!
दोन वेळच्या विश्वचषक विजेत्या कॅरेबियन दिग्गजाचा क्रिकेटला रामराम