---Advertisement---

“कर्णधारासह सगळेच स्वार्थासाठी खेळले “, इंग्लंडच्या दिग्गजाचा आपल्याच सहकाऱ्यांवर गंभीर आरोप

On: गुरूवार, जून 1, 2023 8:45 PM
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मानाची मालिका म्हणून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या ऍशेस कसोटी मालिकेला गौरविले जाते. पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये ही पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. त्यापूर्वीच इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टीव्ह हार्मिसन याने केलेल्या एका वक्तव्यामुळे इंग्लंड क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. त्याने आपल्याच संघातील त्यावेळच्या वरिष्ठ खेळाडूंवर स्वार्थीपणाचे आरोप केले आहेत.

अनेक वर्ष इंग्लंडचा प्रमुख वेगवान गोलंदाज राहिलेल्या हार्मिसन याने एका मुलाखतीत बोलताना म्हटले,

“2003, 2001, 1999 आणि 1997 च्या संघांच्या तुलनेत 2005 च्या संघात हा मोठा फरक होता की, आम्ही तेव्हा एक संघ म्हणून एकजुटीने खेळलेलो. 1997, 2002, 2003/04 मध्ये अनेक स्वार्थी खेळाडू इंग्लंड संघासाठी खेळत होते. यामध्ये अनेक महान क्रिकेटपटूंचा समावेश आहे. नासिर हुसेन, मायकेल आथर्टन, ग्रॅहम थॉर्प, डॉमिनिक कॉर्क, डॅरेन गॉफ आणि अँडी कॅडीक हे सगळे त्या काळात स्वतःसाठी खेळत होते, असे म्हणायला मला कदाचित ही काही वाटत नाही. मात्र, 2005 मध्ये आम्ही एक संघ म्हणून खेळलो आणि त्याचाच निकाल आम्हाला मिळाला.”

इंग्लंडने 2005 मध्ये मायकल वॉनच्या नेतृत्वात ऍशेस मालिका जिंकली होती. त्यांनी ऑस्ट्रेलियाचा 2-1असा पराभव केलेला. या विजयात हार्मिसनचे महत्त्वाचे योगदान दिलेले. त्याने पाच कसोटीत 32.29 च्या सरासरीने 17 बळी आपल्या नावे केलेले.

यावेळी ऍशेस मालिकेचे यजमानपद इंग्लंडकडे आहे. मागील वेळी ऑस्ट्रेलियात झालेल्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने विजय संपादन केलेला. यावेळी 16 जूनपासून ऍजबस्टन येथे या मालिकेला सुरुवात होईल. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याच्या नेतृत्वात इंग्लंड प्रथमच ऍशेस खेळेल.

(England Ex Pacer Steve Harmison Said Our Players Naaser Hussain Mike Atherton Are Selfish In Ashes)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
IPL फायनलमधील धोनीचा ‘हा’ भावूक करणारा व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील, जोरदार होतोय व्हायरल
WTC फायनलपूर्वीच कांगारुंना वाटतेय विराट-पुजाराची भीती! चेतावणी देत पाँटिंग म्हणाला, ‘लवकर विकेट…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---