आॅस्ट्रेलियाच्या खेळाडूंकडून मार्च महिन्यात दक्षिण आफ्रिकेत झालेले चेंडू छेडछाड प्रकरण चांगलेच गाजले होते. आॅस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी चेंडूशी छेडछाड करताना सँडपेपरचा वापर केला होता.
त्याप्रकरणी दोषी आढळलेल्या डेविड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट यांच्यावर क्रिकेट आॅस्ट्रेलियाने बंदीची कारवाईही केली.
या प्रकरणाला जवळजवळ आता 3 महिने झाले आहेत. या प्रकरणानंतर आॅस्ट्रेलियाचा संघाने पहिल्यांदाच परदेश दौरा केला आहे. त्यामुळे चेंडू छेडछाड प्रकरण विसरून खेळण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
असे असतानाच, आॅस्ट्रेलियाच्या इंग्लंड दौऱ्यातील पहिल्याच सामन्यात इंग्लंडच्या चाहत्यांकडून आॅस्ट्रेलियाच्या संघाची चेष्टा करण्यात आली आहे.
बुधवारी पार पडलेल्या इंग्लंड विरुद्ध आॅस्ट्रेलिया संघातील पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंडच्या चाहत्यांनी आॅस्ट्रेलियाच्या संघाची चेष्टा करण्यासाठी सँडपेपर आणले होते.
या सँडपेपरवर त्यांनी ‘4’आणि ‘6’चे आकडे काढले होते. चौकार आणि षटकार साजरा करण्यासाठी ते याचा उपयोग करून आॅस्ट्रेलियाच्या खेळांडूची चेष्टा करत होते.
Security at the Oval has seized over 5,000 4 and 6s cards made of sandpaper amidst a continuing debate surrounding Australia's ball-tampering scandal.
Michael Vaughan shared this image on Instagram saying, "You have to chuckle…" #ENGvAUS pic.twitter.com/ZBnw9l07Mc
— Matt Spencer (@MattSpencertv) June 13, 2018
तो पुढे म्हणाला, बाहेर लोक काय बोलत आहे त्याचा काही फरक पडत नाही. आतमध्ये आम्हाला माहित आहे काय बरोबर आहे आणि काय चुकीचे आहे आणि तेच महत्त्वाचे आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–केवळ ५० रुपये तिकीट असुनही ऐतिहासिक कसोटीला जेमतेम ७०० प्रेक्षक!
–धोनीची बॅटिंग पहाण्यासाठी अफगानिस्तानच्या स्टार खेळाडूने काय केले पहाच!
–निर्वासितांच्या छावणीत जन्मलेल्या खेळाडूने केले कसोटी पदार्पण