Jofra Archer: सध्या भारत विरूद्ध इंग्लंड संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिला सामना लीड्सच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात इंग्लंड संघाने भारताचा 5 विकेट्स राखून धुव्वा उडवला. तत्पूर्वी सध्याच्या घडीला जगातील सर्वात घातक गोलंदाजांपैकी एक असलेल्या जोफ्रा आर्चरने एक मोठा रेकाॅर्ड केला आहे. गेल्या सोमवारी त्याने फर्स्ट-क्लास क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. आपल्या फर्स्ट-क्लास कमबॅकमध्ये तो ससेक्ससाठी खेळताना दिसला, जिथे त्याने डरहमविरुद्ध सामना खेळला. महत्त्वाचे म्हणजे, भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील दुसरा सामना 2 जुलैपासून खेळला जाणार आहे, त्यापूर्वी आर्चरचा काउंटी सामना खेळणे त्याच्या कसोटी संघात परतण्याचे संकेत देत आहे. (Jofra Archer Comeback)
जोफ्रा आर्चर गेल्या 4 वर्षांपासून कोणताही कसोटी सामना खेळलेला नाही. 2021 मध्ये भारतावि रुद्ध अहमदाबाद कसोटीनंतर तो कोपराच्या दुखापतींशी झुंजत होता, त्याने 2 शस्त्रक्रिया केल्या आहेत आणि 2022 मध्ये त्याला पाठीच्या खालच्या भागाच्या समस्येशीही झुंजावे लागले. त्यानंतर त्याचे रेड-बॉल करिअर धोक्यात आल्याचे दिसत होते. (Lower Back Injury)
आता काउंटी चॅम्पियनशिपमध्ये परत येताच त्याने आपला प्रभाव पाडला आहे. ससेक्ससाठी खेळताना त्याने डरहमच्या एमिलियो गेला एलबीडब्ल्यू बाद केले. विशेष म्हणजे, गेल्या 1,501 दिवसांतील जोफ्रा आर्चरची ही पहिली फर्स्ट-क्लास विकेट आहे. नुकतेच इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने सांगितले होते की, आर्चर सातत्याने राष्ट्रीय शिबिराशी जोडलेला आहे. जर आर्चर पुढील आठवड्यात आपला फिटनेस सिद्ध करू शकला, तर तो लवकरच कसोटी संघात खेळताना दिसू शकतो. (Jofra Archer First-Class Cricket)
आतापर्यंत आर्चरने फक्त 13 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याच्या नावावर 42 विकेट्स आहेत. त्याने आतापर्यंत 3 वेळा एका डावात 5 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. तर, भारतावि रुद्ध त्याने आतापर्यंत 2 कसोटी सामन्यांमध्ये फक्त 4 विकेट्स घेतल्या आहेत. आर्चरनेही कसोटी संघात परतण्याची आशा व्यक्त केली आहे. सर्वकाही ठीक राहिले, तर तो खूप लवकर परत येईल, असे त्याने सांगितले. (Jofra Archer’s Test career)