इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 8 सप्टेंबरपासून ओव्हलवर खेळवला जाणार आहे. सध्या 3 कसोटी सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. अशा स्थितीत ओव्हल कसोटी, मालिका जिंकणारा संघ त्याच्या नावावर असेल. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांच्या दृष्टीकोनातून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप लक्षात घेता महत्वाचा ठरणार आहे.
या सामन्यापूर्वी दोन्ही संघ खेळाडूंच्या दुखापतींशी झुंज देत आहेत. इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टो गोल्फ खेळताना जखमी झाला. बेअरस्टो या कसोटीत खेळणार नाही.त्याच्या जागी त्याच्या काउंटी संघ यॉर्कशायरचा सहकारी फलंदाज हॅरी ब्रूकचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. ब्रुक कसोटी पदार्पण करणार आहे. ब्रूकने या वर्षी जानेवारीमध्ये इंग्लंडच्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. ब्रुक हा इंग्लंडच्या अंडर-19 संघाचा कर्णधारही राहिला आहे.
तिसऱ्या कसोटीसाठी ब्रुकिंगचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स म्हणाला की, “मी या आठवड्यात ब्रुकला खेळताना पाहण्यासाठी उत्सुक आहे. तो या संधीला पात्र आहे.” काही आठवड्यांपूर्वीही मी ब्रुकबद्दल सांगितले होते की, “तो असा खेळाडू आहे जो इंग्लंडकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये दीर्घकाळ खेळेल.”
ब्रुक 107 च्या सरासरीने धावा करत आहे
इंग्लिश कर्णधार स्टोक्सचे हे भाकीत देखील योग्य असल्याचे दिसते, कारण 23 वर्षीय ब्रूक काउंटी चॅम्पियनशिपच्या विभाग 1च्या या हंगामात 107च्या सरासरीने धावा करत आहे. 2021च्या उन्हाळ्याच्या सुरुवातीपासून, ब्रुकने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 1782 धावा केल्या आहेत. त्याच्या कारकिर्दीतील 7 शतकांपैकी 5 ब्रुकने या काळात झळकावले आहेत. या उन्हाळ्यातही त्याची बॅट जोरदार बोलते आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इंग्लंड लायन्सकडून 140 धावांची खेळी खेळली. ब्रूकने आतापर्यंत 56 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 3067 धावा केल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नसीम शाहने मारलेल्या षटकारांचे रहस्य बॅटमध्ये दडलंय! विजयानंतर स्वत:च केला मोठा खुलासा
‘चाहरची संघात एन्ट्री- भुवीची हकालपट्टी!’ पाहा अफगाणिस्तान विरुद्ध भारताची संभाव्य प्लेइंग 11
PAKvsAFG: सामन्यातील पराभवानंतर अफगाणि चाहत्यांचे ‘तालिबानी रुप!’ मैदानातील हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल