---Advertisement---

दोन्ही हातांनी गोलंदाजी करत या गोलंदाजाने रुट, मॉर्गनला टाकले गोंधळात

---Advertisement---

इंग्लडचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आला असून शुक्रवारी (5 आॅक्टोबर) त्यांचा श्रीलंका एकादश संघाविरुद्ध वनडेचा सराव सामना पार पडला. या सामन्यात श्रीलंका संघाचा किमांडू मेंडीस या गोलंदाजाने दोन्ही हातांनी गोलंदाजी केली आहे.

या सामन्यात विजयासाठी 288 धावांचे लक्ष्य श्रीलंकेने इंग्लंडसमोर ठेवले होते. यावेळी इंग्लंड या धावांचा पाठलाग करत असताना मेंडीस 14 व्या षटकात गोलंदाजीसाठी आला.

या षटकात त्याने पहिले पाच चेंडू उजव्या हाताने इंग्लंडचा कर्णधार आणि डावखरी फलंदाज असणाऱ्या इयान मॉर्गनला टाकले. तर शेवटचा चेंडू त्याने उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या जो रुटला डाव्या हाताने टाकला. यावेळी त्याने हा शेवटचा चेंडू टाकण्याआधी मैदानावरील पंचांना याबद्दल माहिती दिली होती.

मुळात डावखरी असणाऱ्या या गोलंदाजाने याआधीही त्याच्यातील दोन्ही हातांनी गोलंदाजी करण्याची क्षमता सर्वांना 2016 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकावेळी दाखवली होती.

या सामन्यात मेंडीसने फलंदाजीतही चांगली चमक दाखवली आहे. त्याने फलंदाजी करताना 61 धावांची अर्धशतकी खेळी केली आहे. मात्र असे असले तरी त्याला विकेट मात्र घेता आली नाही.

या सामन्यात रुट आणि मॉर्गनने तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 174 धावांची भागीदारी रचली. पण त्यानंतर खराब प्रकाशझोताच्या कारणाने सामना थांबवण्यात आला. त्यामुळे इंग्लंडला डकवर्थ लूइस नियमानुसार 43 धावांनी विजेता घोषित करण्यात आले.

इंग्लंडकडून रुटने नाबाद 90 आणि मॉर्गनने नाबाद 91 धावा केल्या आहेत. इंग्लंडने 35.3 षटकात 2 बाद 215 धावा केल्या होत्या.

मेंडीसप्रमाणेच भारताचा अक्षय कर्नेवरकडेही दोन्ही हातांनी गोलंदाजी करण्याची कला आहे. जी मागीलवर्षी चेन्नईमध्ये आॅस्ट्रेलिया विरुद्धच्या सराव सामन्यात पहायला मिळाली होती.

त्याचबरोबर 1996 च्या विश्वचशकात केनिया विरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेचा हशन तिलकारत्नेने दोन्ही हाताने गोलंदाजी केली होती. हा सामना श्रीलंकेने जिंकला होता. तसेच इंग्लंजचे माजी फलंदाज ग्रॅहम गुच यांच्याकडेही दोन्ही हातांनी गोलंदाजी करण्याची क्षमता होती.

महत्वाच्या बातम्या-

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment