आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 25वा सामना गुरुवारी (दि. 26 ऑक्टोबर) इंग्लंड विरुद्ध श्रीलंका संघात खेळला जाणार आहे. हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक इंग्लंड कर्णधार जोस बटलर याने जिंकली असून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ कडवी झुंज देतील.
या सामन्यात इंग्लंड संघाने तीन बदल केले आहेत. सामन्यात ख्रिस वोक्स, मोईन अली आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांचे पुनरागमन झाले आहे. तसेच, हॅरी ब्रूक्स, गस एटकिन्सन आणि रीस टोप्लीला बाहेर काढले आहे. दुसरीकडे, श्रीलंका संघात अँजेलो मॅथ्यूज आणि लाहिरू कुमारा यांचे पुनरागमन झाले आहे.
स्पर्धेत कुणाचं पारडं जड?
वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेत इंग्लंड आणि श्रीलंका संघ एका नावेत आहेत. कारण, दोन्ही संघांनी आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. त्यात त्यांना फक्त 1 विजय, तर 3 पराभव पत्करावे लागले आहेत. दोन्ही संघ एकाच नावेत असूनही या सामन्यात इंग्लंडवर जास्त दबाव असेल. कारण, इंग्लंडने आपल्या मागील दोन्ही सामन्यात अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव पत्करला आहे. दुसरीकडे मात्र श्रीलंका संघाने मागील सामन्यात नेदरलँड्सविरुद्ध 5 विकेट्सने जिंकून स्पर्धेत पुनरागमन केले आहे.
अशात श्रीलंका संघ आपले विजयी सत्र सुरूच ठेवण्याचा प्रयत्न करेल. तसेच, इंग्लंड संघ पराभवाची हॅट्रिक टाळण्याचा प्रयत्न करेल. (England have won the toss and have opted to bat against Sri Lanka)
स्पर्धेतील 25व्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
इंग्लंड
जॉनी बेअरस्टो, डेविड मालन, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (कर्णधार/यष्टीरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदिल रशीद, मार्क वूड
श्रीलंका
पथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (कर्णधार/यष्टीरक्षक), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, अँजेलो मॅथ्यूज, महीश थीक्षणा, कसून राजिथा, लाहिरू कुमारा, दिलशान मदुशंका
हेही वाचा-
CWC 23: ऑस्ट्रेलियाच्या विजयामुळे पाकिस्तानसाठी संकट, Points Tableमध्ये सर्वात मोठा फेरबदल
‘मला फलंदाजी करायचीच नव्हती…’, झंझावाती शतक झळकावल्यानंतर मॅक्सवेलचा धक्कादायक खुलासा