ऑस्ट्रेलियात आयोजित केल्या गेलेल्या आठव्या टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (13 नोव्हेंबर) खेळला गेला. मेलबर्न येथे झालेल्या या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानला 5 गडी राखून पराभूत करत विश्वचषक आपल्या नावे केला. इंग्लंडने दुसऱ्यांदा टी20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. त्यांच्या या विजयानंतर संपूर्ण संघाचे कौतुक होत असताना, संघाचे मुख्य प्रशिक्षक मॅथ्यू मॉट (Matthew Mott) यांच्या नावाची देखील चर्चा होत आहे.
चालू वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडच्या कसोटी संघाला ऍशेस मालिकेत पराभूत व्हावे लागले होते. त्यानंतर इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाले. कसोटी संघाचे नेतृत्व बेन स्टोक्सकडे दिले गेलेले. तर, न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रँडन मॅकलम याला कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवले गेले. मे महिन्यात नेदरलँडविरुद्धच्या मालिकेआधी इंग्लंडने केवळ मर्यादित षटकांच्या संघासाठी मॅथ्यू मॉट यांची निवड केली. तत्पूर्वी, मॉट हे मागील सात वर्षांपासून ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक होते.
Motty MCG Finals
— England Cricket (@englandcricket) November 13, 2022
मॉट यांनी ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघासोबतच्या आपल्या कार्यकाळात ऑस्ट्रेलियाला तीन वेळा विश्वविजेतेपद पटकावून दिलेले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऑस्ट्रेलियन महिला संघाने 2018 व 2020 मध्ये टी20 विश्वचषक आपल्या नावे केलेला. तर, या वर्षाच्या सुरुवातीलाच वनडे विश्वचषकावर देखील आपली मोहर उमटवली होते. इतकेच नव्हे तर त्यांच्याच मार्गदर्शनात 2009 मध्ये न्यू साउथ वेल्सने जगभरातील सर्व टी20 विजेत्यांच्या चॅम्पियन्स लीग स्पर्धेची ट्रॉफी देखील आपल्या नावे केलेली.
मॉट हे इंग्लंड संघात सामील झाल्यानंतर काही दिवसातच जोस बटलरने मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार म्हणून कार्यभार सांभाळला. या जोडीने त्यानंतर आता आपली कमाल दाखवत थेट विश्वचषकाला गवसणी घातली आहे. मॉट यांचा कार्यकाळ आणखी साडेतीन वर्ष असणार आहे. या कालावधीत इंग्लंड प्रत्येकी एक टी20 व वनडे विश्वचषक खेळेल. त्यांच्याच मार्गदर्शनात इंग्लंड आपल्या वनडे विश्वचषकाचा बचाव करताना दिसणार आहे.
(England Head Coach Matthew Mott Won Fourth World Cup As Coach)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आतापर्यंत ‘या’ संघांनी उंचावलीय टी20 वर्ल्डकपची ट्रॉफी, विजेत्यांची संपूर्ण यादी एकाच क्लिकवर
टी-20 विश्वचषकाच्या बाद फेरीत बटलरचे ऐतिहासिक प्रदर्शन, खास यादीत मिळवला विराटनंतरचा क्रमांक