---Advertisement---

बॉक्सिंग डे कसोटीआधी रूटसेनेत मोठे बदल; चार वरिष्ठ खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता; पाहा प्लेइंग इलेव्हन

On: शनिवार, डिसेंबर 25, 2021 11:29 AM
england ashes team
---Advertisement---

इंग्लंड संघ अजूनही ऍशेस २०२१-२२ (Ashes 2021-22) मालिकेत विजय मिळवू शकला नाही. पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे. त्यामुळे इंग्लंड संघ ०-२ ने पिछाडीवर आहे. इंग्लंडला मालिका गमवायची नसेल तर इंग्लंडला बॉक्सिंग डे कसोटी जिंकावी लागणार आहे. त्यामुळे संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले आहेत. हे बदल सलामीवीर फलंदाजापासून मधल्या फळीतल्या फलंदाजांसह गोलंदाजांपर्यंत आहे.

प्लेइंग इलेव्हनमधला पहिला बदल म्हणजे हसीब हमीद सोबतचा सलामीवीर फलंदाज रॉरी बर्न्सला (Rory Burns) संघातून वगळण्यात आलं आहे. तो दोन्ही कसोटी सामन्यात चांगली सुरुवात करून देऊ शकला नव्हता. ब्रिस्बेन कसोटीत तर तो डावाच्या पहिल्या चेंडूलाच बाद झालेला. त्यामुळे त्याला बॉक्सिंग डे कसोटी न खेळवण्याचा निर्णय इंग्लंड संघाने घेतला. तसेच त्याच्या जागी येणाऱ्या झॅक क्राऊलीने (Zak Crawley) सुद्धा काही विशेष अशी कामगिरी नाही केली. त्याने २०२१ मध्ये खेळलेल्या ७ कसोटी सामन्यात फक्त ११.१४ च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

प्लेइंग इलेव्हनमधले मोठे बदल
ओली पोपला (Ollie Pope) सुद्धा प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी संघात जॉनी बेअरस्टोला (Johnny Bairstow) घेण्यात आलं आहे. यामागचं कारण म्हणजे बेअरस्टोला मेलबर्नवर खेळण्याचा अनुभव आहे. त्याने ऍशेसमध्ये मेलबर्न येथे २ कसोटी सामने खेळले आहेत. अष्टपैलू खेळाडू मार्क वूडला (Mark Wood) ख्रिस वोक्सच्या (Chris Woakes) जागी संघात घेण्यात आलं आहे. वोक्सने २ सामन्यात १०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्याने खेळलेल्या ४ डावांत २ अंकी आकडा नेहमी पार केला आहे. फिरकीपटू जॅक लीचला (Jack Leach) स्टुअर्ट ब्रॉडच्या (Stuart Broad) जागी संघात घेण्यात आले आहे. दुसऱ्या दिवस-रात्र कसोटीत जॅक लीचला संघात स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे इंग्लंड संघावर टीका केली गेली होती.

बॉक्सिंग डे कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन
हसीब हमीद, झॅक क्राऊली, डेव्हिड मलान, जो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्टो, जॉस बटलर, मार्क वूड, ऑली रॉबिन्सन, जॅक लीच, जेम्स अँडरसन

महत्त्वाच्या बातम्या-

‘सूर्या’ पुन्हा एकदा तळपला! २४९ धावांच्या स्फोटक खेळीत पाडला षटकार-चौकारांचा पाऊस

द्रविडच्या ‘या’ सल्ल्यामुळे मयंक करू शकला संघात पुनरागमन, स्वतः केला खुलासा

जगातील कोणत्याही संघाला पुरून उरेल भारताचा हा संघ, १९८३ आणि २०११च्या विश्वविजेत्या खेळाडूंचा आहे समावेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---